---Advertisement---

आयपीएल २०२१ चा मार्ग मोकळा! कोरोना सावटाखाली मुंबईच्या स्टेडियवमर सराव करण्याची मिळाली परवानगी

On: मंगळवार, एप्रिल 6, 2021 7:41 AM
---Advertisement---

मुंबई: भारतात सध्या सर्वत्र कोरोनाचा विळखा पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारचे खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी (०४ एप्रिल) मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा परिणाम इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ साठी मुंबईत सराव करणाऱ्या फ्रँचायझींवर होण्याची शक्यता होती. मात्र सोमवार रोजी (०५ एप्रिल) महाराष्ट्र सरकारने फ्रँचायजींची चिंता दूर केली आहे.

मुंबईत असलेल्या सर्व आयपीएल फ्रँचायझींना रात्री ८ नंतर सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबरोबरच खेळाडूंना हॉटेल ते मैदान असा प्रवास करण्याचीही मुभा देण्यात आली आहे.

असे असले तरीही, राज्य सरकारने आयपीएल फ्रँचायझींना जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत सराव करण्यास सांगितले आहे. ९ एप्रिलपासून चेन्नई येथील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२१ चा श्रीगणेशा होणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पत्रात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव, श्रीरंग घोलप यांनी लिहिले आहे की, ‘आयपीएल सामन्यांची वेळ लक्षात घेता फ्रँचायझींना सीसीआय (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया) आणि एमसीए (मुंबई क्रिकेट संघाचे वानखेडे स्टेडियम) मध्ये सराव करण्याची सूट देण्यात आली आहे. दुपारी ४ ते संध्याकाळी ६.३० आणि संध्याकाळी ७ ते रात्री १० अशा दोन सत्रात सरावाची वेळ निश्चित करण्यात आली आहे.’

एप्रिल १०, रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हंगामातील दुसरा सामना रंगणार आहे. या सामन्यासह एकूण १० आयपीएल सामन्यांचे या स्टेडियमवर आयोजन करण्यात आले आहे. हे सामने रात्री साडेसात वाजता सुरू होतील.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल प्रेमींसाठी खुशखबर! वानखेडे स्टेडियमचा ग्राउंड स्टाफ सुटला कोरोनाच्या तावडीतून

सचिन लेक आयपीएल पदार्पणासाठी करतोय कसून सराव, पाहा त्याची अफलातून गोलंदाजी 

फखर जमानला फेक फिल्डिंगने बाद केल्याने क्विंटन डीकॉक वादाच्या भोवऱ्यात; पाहा नियम नक्की काय सांगतो?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---