मुंबई :- २८जानेवारीपासून मध्य प्रदेश येथे होणाऱ्या १४वर्षाखालील राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राचा संघ नुकताच जाहीर करण्यात आला. या संघात मुंबईतून भांडुपच्या सेंट झेवरिज शाळेची सेरेना म्हसकर या एकीचीच निवड झाली आहे. सेरेना ही शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मेघाली कोरगावकर – म्हसकर आणि राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सचिन म्हसकर यांची कन्या. तिची आजी लीला पाटील – कोरगावकर, आणि शशिकांत कोरगावकर या दोन्ही कबड्डी खेळाडूंची नात. तिच्या रक्तातच कबड्डी भिनलेली आहे. तिच्या बरोबर या संघात साताऱ्याचे ४, परभणीचे ३, रत्नागिरी, सांगली, पुणे, नाशिक या जिल्ह्याच्या १-१ खेळाडूंची निवड झाली आहे. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.
१४वर्षाखालील महाराष्ट्राचा शालेय संघ :- १)निकिता जाधव, २)आरती खांडेकर, ३)मृदुला मोहिते(तिन्ही सातारा), ४)यशस्वी इंगोले, ५)प्रतीक्षा राठोड(परभणी), ६)भूमिका माने(सातारा), ७) श्रिया हुबरे, ८)अनुष्का चव्हाण(सांगली), ९)श्रावणी कुलकर्णी(परभणी), १०)सोनल काकडे(नाशिक), ११)सेरेना म्हसकर(मुंबई), १२)समृद्धी लांडगे(पुणे).
(Maharashtra team announced for Under 14 National School Kabaddi Tournament to be held in Madhya Pradesh from 28th January)
महत्वाच्या बातम्या –
Australia Open । बोपन्नाच्या कामगिरीने उंचावली भारतीयांची मान, 43 व्या वर्षी ऑस्ट्रेलिया ओपन केला महाविक्रम
Australia Open । आर्यना सबालेंका पुन्हा बनली टेनिस कोर्टची राणी, दुसऱ्यांदा जिंकले ग्रँड स्लॅम