---Advertisement---

वैयक्तिक मिडले रिलेमध्ये सान्वी देशवालचा दुहेरी धमाका

On: सोमवार, फेब्रुवारी 3, 2025 11:01 PM
---Advertisement---

हल्दवानी: महाराष्ट्राच्या सान्वी देशवाल हिने वैयक्तिक मिडले प्रकारात आपले वर्चस्व प्रस्थापित करताना 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 200 मीटर्स शर्यतीतही सोनेरी कामगिरी केली. याआधी तिने याच स्पर्धेमध्ये 400 मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. या सुवर्णपदकाखेरीज महाराष्ट्राने जलतरणामध्ये 3 कांस्यपदके, तर डायव्हिंगमध्येही एक कांस्यपदक जिंकले.

सान्वी देशवाल हिने 200 मीटर्स शर्यत 2 मिनिटे 24.90 सेकंदात पार केली. या शर्यतीमध्ये तिने ब्रेस्ट स्ट्रोक, बॅकस्टोक, बटरफ्लाय व फ्री स्टाईल या चारही शैलीमध्ये सर्वोत्तम कौशल्य दाखविले. “आजच्या शर्यतीतही सुवर्णपदक जिंकण्याबाबत मला आत्मविश्वास होता. तरीही मी या शर्यतीबाबत योग्य नियोजन केले होते, आणि त्यानुसारच माझी कामगिरी झाली. 400 मीटर्स पाठोपाठ आजची शर्यत जिंकल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे.” असे सान्वी देशवाल हिने सांगितले.

महाराष्ट्राच्या अदिती हेगडे हिने 400 मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत कांस्यपदक पटकावले. हे अंतर पार करण्यास तिला 4 मिनिटे 35.34 सेकंद वेळ लागला. तिची सहकारी ऋतुजा राजाज्ञ हिने आपल्या नावावर आणखी एका कांस्य पदकाची नोंद केली. तिने 50 मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यत 31.50 सेकंदात पार केली. पुरुषांच्या 50 मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषभ दास याने कांस्यपदकाची कमाई केली. त्याला हे अंतर पार करण्यास 26.45 सेकंद वेळ लागला.

महत्त्वाच्या बातम्या-

वॉटरपोलोत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत
तिरंदाजीत महाराष्ट्राला सुवर्ण चौकाराची संधी!
ट्रॅक सायकलिंगमध्ये पुण्याच्या श्वेता गुजाळला सुवर्ण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---