---Advertisement---

विरार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी स्पोर्ट्स, अंकुर स्पोर्ट्स क्लब संघाना विजेतेपद

On: मंगळवार, फेब्रुवारी 11, 2020 3:56 PM
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय आंबे माँ युवा मंडळ अयोजीत राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत मुंबई शहराच्या अंकुर स्पोर्ट्स क्लब व मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब यांनी विजेतेपद पटकावले.

महिला विभागात एकूण १२ संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामना मुंबई शहराच्या शिवशक्ती विरुद्ध मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स यांच्यात झाला. अंतिम सामना शिवशक्ती २९-२२ असा महात्मा गांधी स्पोर्ट्स संघाने जिंकला. शेवटच्या ६ मिनिटात ९ गुणाची पिछाडी भरून काढत ७ गुणांनी विजय मिळवला.

तर पुरुष विभागातही १२ संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामना मुंबई शहराच्या अंकुर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पालघर आई अष्टभुजा यांच्यात झाला. अंकुर स्पोर्ट्स संघाने २६-२२ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अंकुर स्पोर्ट्सने अमर हिंदचा तर आई अष्टभुजा संघाने विजय क्लबवर उपांत्य फेरीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

स्पर्धेतील महिला विभागात महात्मा गांधी स्पोर्ट्सच्या सायली जाधवला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर पुरुष विभागात अंकुरच्या राकेश मोकलला मालिकेत मालिकावीरने गौरविण्यात आले.

संक्षिप्त निकाल:

महिला विभाग:

विजेते- महात्मा गांधी स्पोर्ट्स, मुंबई उपनगर

उपविजेते- शिवशक्ती महिला संघ, मुंबई शहर

तिसरा स्थान- संघर्ष क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर

चौथा स्थान- श्री राम महिला कबड्डी संघ, पालघर

उत्कृष्ट चढाईपटू- ज्योती डफले

उत्कृष्ट पकडपटू- तेजस्विनी गिलबिले

मालिकावीर- सायली जाधव

पुरुष विभाग:

विजेते- अंकुर स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर

उपविजेते- आई अष्टभुजा संघ, पालघर

तिसरा स्थान- अमर हिंद मंडळ, मुंबई शहर

चौथा स्थान- विजय क्लब, मुंबई शहर

उत्कृष्ट चढाईपटू- रोशन वैती

उत्कृष्ट पकडपटू- सुमित साईल

मालिकावीर- राकेश मोकल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---