---Advertisement---

श्रीलंकेने संघाची दयनीय अवस्था पाहता घेतला ‘मोठा’ निर्णय; मुंबई इंडियन्सच्या कोचला दिली द्रविडप्रमाणे जबाबदारी

---Advertisement---

श्रीलंकन क्रिकेट संघाला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या संघात अनेक युवा खेळाडू आहेत, ज्यांनी नुकतेच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे. त्यामुळेच अननुभवी श्रीलंकन संघाला गेल्या काही मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या कामगिरीत सुधार करण्यासाठी श्रीलंका क्रिकटने बीसीसीआयने ज्या रणनीतीचा अवलंब केला होता. त्याच रणनीतीचा अवलंब करायचे ठरवले आहे.

भारतीय संघाचे माजी फलंदाज राहुल द्रविड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केल्यानंतर नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये युवा खेळाडूंना घडवण्यामध्ये मोलाचा हातभार लावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेले खेळाडू भारतीय वरिष्ठ संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यांनी भारतीय १९ वर्षाखालील संघाला प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय १९ वर्षाखालील संघाने २०१८ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. या संघातील पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल हे खेळाडू सध्या वरिष्ठ भारतीय संघात मोलाची भूमिका बजावत आहेत.

याच नीतीचा अवलंब करत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने माजी श्रीलंकन फलंदाज महिला जयवर्धनेला १९ वर्षाखालील संघाचा सल्लागार म्हणून निवड केली आहे. ते ही जबाबदारी निःशुल्क पार पाडणार आहेत.(Mahela Jayawardene appointed as consultant of under 19 srilanka team)

श्रीलंकन मीडिया फर्म क्रीकफायरच्या वृत्तानुसार अरविंद डी सिल्वा यांनी पुष्टी केली आहे की, १९ वर्षाखालील संघासाठी महेला जयवर्धने हे सल्लागाराची भूमिका पार पाडणार आहेत. त्यांनी अशी आशा व्यक्त केली आहे की नवीन भूमिकेत ते खेळाडूंसह प्रशिक्षकांना देखील मार्गदर्शन करतील.

महेला जयवर्धने हे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या समाप्तीनंतर ही भूमिका हाती घेणार आहेत. ते सध्या गतवर्षीचा विजयी संघ मुंबई इंडियन्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत. ४४ वर्षीय महेला जयवर्धने यांना प्रशिक्षण देण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी २०१६ पासून मुंबई इंडियन्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे.

महत्वाच्या बातम्या-

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ६- २०१९ विश्वचषक उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये काय झाले?

धोनीच्या ‘त्या’ बॅटवर लागली होती कोटींची बोली, गिनीज बुकमध्ये आहे नोंद

अफलातून! न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने डाइव्ह मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---