सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी घराबाहेर पडू नका, गर्दी करु नका असे आवाहन करत आहे. पण श्रीलंकेमध्ये एका ठिकाणी गर्दी केल्याचा फोटो दिग्गज क्रिकेटपटू माहेला जयवर्धनेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्यावर त्याने म्हटले आहे की ‘यावर काय म्हणावे.’
https://www.instagram.com/p/B98c1OBBKeE/
मात्र जयवर्धनेच्या या पोस्टवर काही चाहत्यांनी टीका केली आहे. एका चाहत्याने त्याला म्हटले आहे की सर्वांना त्याच्यासारखा सेलिब्रेटी असण्याचा फायदा मिळत नाही. निदान खरेदीच्या बाबतीत तरी. पण जयवर्धनेने या चाहत्याला तुझ्यासारख्या लोकांसाठी ट्विटर बनवलं नाही, असे म्हणत प्रतिउत्तर दिले आहे.
जयवर्धनेने या चाहत्याला उत्तर देताना म्हटले आहे की ‘मी कोणताही फायदा घेत नाही. मी फक्त एवढेच म्हणत होतो की एका रात्रीत १००० कोरोना व्हायरसच्या केस होऊ नये म्हणून त्यांना अंतर ठेवा. ट्विटर तूझ्यासारख्या स्वत:ला स्मार्ट समजणाऱ्या लोकांसाठी नाही. त्यामुळे उपहासात्मक बोलण्यासाठी दुसरा पर्याय शोध.’
यावर दुसऱ्या एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘मी कोणताही फायदा घेत नाही’ हे एक असा व्यक्ती सांगतोय ज्याला कधीही किराणा खरेदी करायला जाण्याची गरज नाही.’
यावरही जयवर्धननेने उत्तर दिले आहे की ‘मला वाटते तूम्ही जात नसावेत कारण मी तूम्हाला कधीही आजूबाजूला पाहलेले नाही. जेव्हा मी स्थानिक ठिकाणी खरेदी करतो तेव्हा खूप लोकांनी मला पाहिले आहे. तूम्ही आणखी एक हुशार व्यक्ती आहात.’
ट्रेंडिंग घडामोडी-
–जगातील श्रीमंत क्रिकेट लीगमधून डेविड वाॅर्नर बाहेर
–राॅस टेलर- मॅक्क्युलम या २०१२ क्रिकेट वादावर मॅक्क्युलमने प्रथमच केला मोठा खुलासा
–आधी चुकला असला तरी या ३ कारणांमुळे उनाडकटला टीम इंडियात दिली पाहिजे संधी