---Advertisement---

‘माही मार रहा है’! सरावादरम्यान धोनीने मारले एक से बढकर एक षटकार; पाहा व्हिडिओ

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या आयपीएल १४ व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यातीसाठी सर्व संघ तयारीला लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलला २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित ३१ सामन्यांचा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यासाठी मुंबई इंडियन्स (एमआय) आणि चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) दोन्ही संघ आधीच यूएईला रवाना झाले आहेत.

या दोन्ही संघाचा ७ दिवसांचा विलगीकरणाचा काळ संपलेला आहे. दोन्ही संघांनी आता सराव सत्राला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, शुक्रवारी (२० ऑगस्ट) सीएसकेने दुबईच्या आयसीसी अकॅडमीमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फॅन पेजवरून याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनी फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

धोनीने सरावादरम्यान २-३ चेंडूवर षटकार मारलेले या व्हिडीओत दिसत आहे. धोनीने यातील एका चेंडूवर खूप लांब शॉट मारला ज्यामुळे चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर गेला. व्हिडिओ सोबत ‘आवाज’ असे कॅप्शन लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CSzTKORgthX/

तसेच सीएसकेने देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये संघातील खेळाडू सराव सत्रामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड, दीपक चाहर आणि इतर खेळाडू नेटमध्ये सरावापूर्वी फुटबॉल खेळताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सीएसकेने ‘पहिल्या दिवसाचा सराव’ असे लिहिले आहे.

दरम्यान, सीएसके आणि मुंबई इंडियन्स नंतर आता आयपीएलचे इतर संघ देखील लवकरच यूएईला रवाना होतील. ज्यानंतर कोविड नियमानुसार आखून देण्यात आलेल्या, विलगीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जाऊन खेळाडूंना सरावासाठी परवानगी मिळेल. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. चेन्नईचा संघ ७ पैकी ५ सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबईचा संघ ७ पैकी ३ सामने जिंकून चौथ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
चॅलेंजर्स रेडी फॉर चॅलेंज! आरसीबीचा संघ ‘या’ दिवशी भरणार यूएईसाठी उड्डाण
नव्या भूमिकेसाठी इरफान सज्ज; ‘तो’ अभ्यासक्रम पूर्ण करताच आयपीएलमध्ये प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त
चोरी प्रकरणात बीसीसीआयने हस्तक्षेप करण्याची रसूलची मागणी, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---