भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला जागतिक क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. एमएस धोनीने २००४ मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले आणि काही वर्षानंतर तो संघाचा कर्णधार झाला. २००७ च्या टी-२० विश्वचषकात एमएस धोनीला प्रथमच कर्णधारपद मिळालं. यानंतर, त्याने सन २०१७ पर्यंत संघाचे नेतृत्व केले आणि कर्णधारपदी असताना बरेच विक्रम नोंदविले.
याशिवाय तो २००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये त्याने अनेक विक्रम केले आहेत. आयपीएलमध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राइजिंग पुणे सुपरजायंट संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर चमकदार कामगिरी देखील केली. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व मोसमात धोनीने चेन्नईचे नेतृत्व केले आहे. तर २०१६ मध्ये त्याने रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व केले आहे. या दरम्यान धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १९० सामने खेळले असून ४२.२० च्या सरासरीने ४४३२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २३ अर्धशतके केली आहेत. हे १९० सामने खेळताना त्याने काही खास विक्रम केले, त्याचा हा आढावा –
धोनीने आयपीएलमध्ये केलेले विक्रम –
कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय
एमएस धोनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राइजिंग पुणे सुपरजायंटचे नेतृत्व केले आहे. कर्णधार म्हणून त्याने दोन्ही संघांकडून १०४ सामने जिंकले आहेत. चेन्नईकडून त्याने कर्णधार म्हणून ९९ सामने जिंकले, तर पुण्याकडून ५ सामने जिंकले. तो आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांत विजय मिळवणारा पहिला कर्णधार आहे.
५ वेगवेगळ्या क्रमांकावर अर्धशतके करणारा एकमेव क्रिकेटपटू
एमएस धोनीची आयपीएल कारकीर्द खूपच प्रभावी आहे. त्याने फलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. धोनी आयपीएलमध्ये पाच वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतके करणारा एकमेव फलंदाजही आहे. त्याने तिसर्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतके केली आहे.
डावाच्या २० व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
टी-२० क्रिकेटच्या कोणत्याही डावाच्या शेवटच्या षटकात फलंदाज नेहमीच जास्त धावा करतो. धोनीबद्दल बोलायचं तर त्याने आयपीएल कारकीर्दीतील शेवटच्या षटकात म्हणजेच २० व्या षटकात एकूण ५६४ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे २० व्या षटकात तो ५०० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला खेळाडू आहे.
विकेटच्या मागे सर्वाधिक शिकार
एमएस धोनीने विकेटच्या मागेही चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलच्या एकूण कारकीर्दीत धोनीने यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक १३२ बळी घेतले असून त्यामध्ये त्याने ८४ झेल आणि ३८ यष्टीचीत केले. आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक बळी घेणारा यष्टीरक्षक आहे.
सर्वाधिकवेळा फलंदाजांना यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक –
विकेटच्या मागे धोनी चित्यांसारखा चपळाईने क्षेत्ररक्षण करतो. त्याने आत्तापर्यंत अनेकदा जबरदस्त यष्टीचीत केले आहेत. एमएस धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक ३८ वेळा फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार
कर्णधार म्हणून धोनीचे नाव क्रिकेट इतिहासात कायम लक्षात राहील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा आयपीएल. आयपीएलबद्दल बोलायचं तर त्याने १७४ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यापैकी त्यानी चेन्नई सुपर किंग्सचे १६० सामन्यांमध्ये आणि रायझिंग पुणे सुपरजॉईंटचे १४ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.
सर्वाधिक आयपीएल अंतिम सामने
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अंतिम सामने खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर आहे. चेन्नई सुपर किंग्जने ८ वेळा अंतिम सामना खेळला आहे. तर एमएस धोनी हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने आयपीएल कारकीर्दीत ९ वेळा अंतिम सामना खेळण्याचा विक्रम केला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना ८ वेळा अंतिम सामने खेळले आहे. तसेच १ वेळा रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून त्याने अंतिम सामना खेळला आहे.
वाचनीय लेख –
इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो, ‘भारताचे हे ३ खेळाडू आहेत गाढव’
अतिशय देखण्या बायका असलेले ५ फ्लॉप भारतीय क्रिकेटर्स