आयपीएल २०२२चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील पहिला सामना येत्या २६ मार्च रोजी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे. दोन्ही संघ मागच्या वेळी अंतिम सामन्यात एकमेकांना भिडले होते. त्यावेळी चेन्नईने विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलच्या किताबावर आपले नाव कोरले होते. आता आयपीएल २०२२ चे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर चेन्नई संघाने आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ जोरदार सराव करत आहे.
चेन्नई (Chennai Super Kings) संघाने आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी गुजरात येथील सूरतमध्ये आपल्या सराव सत्राचे आयोजन केले आहे. या ठिकाणी संघ सराव करत आहे. चेन्नईने रविवारी (०६ मार्च) ट्विटरवर धोनीचा (MS Dhoni) एक फोटो शेअर केला आहे. खरं तर, हा फोटो सरावानंतरचा आहे. संघाने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही सर्वजण आयपीएल सामन्याच्या पहिल्या दिवसाची वाट पाहत आहोत.” चेन्नई संघ सध्या सूरतच्या लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडिअमवर आपला सराव करत आहे.
The Hi 👋 we have been waiting for!🤩 Day 1⃣: 🏏#WhistlePodu #SingamsInSurat 🦁 pic.twitter.com/WgvSPK43Sy
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 6, 2022
आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्स दुसरा सामना ३१ मार्च रोजी लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध खेळतील. चेन्नईचा तिसरा सामना ३ एप्रिल रोजी पंजाब किंग्स, चौथा ९ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद, पाचवा १२ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व सहावा सामना १७ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होईल. २१ एप्रिलला मुंबई इंडियन्सकडून सातवा सामना खेळून ते साखळी फेरीतील अर्धे सामने पूर्ण करतील.
पंजाब किंग्सविरूद्ध २५ एप्रिल रोजी आठवा सामना खेळून ते स्पर्धेच्या उत्तरार्धाला सुरुवात करतील. एक मे रोजी सनरायझर्स हैदराबाद, ४ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध ८ मे रोजी ते आमनेसामने येतील. स्पर्धेतील अखेरचे तीन सामने चेन्नई अनुक्रमे मुंबई इंडियन्स (१२ मे), गुजरात टायटन्स (१५ मे) आणि राजस्थान रॉयल्स (२० मे) यांच्याशी खेळतील.
महत्वाच्या बातम्या-
असे असणार मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२२ साठी वेळापत्रक; ‘या’ संघाविरुद्ध खेळणार पहिला सामना
आयपीएल २०२२मधून धोनीचा पत्ता होणार कट? ‘हा’ खेळाडू सांभाळू शकतो चेन्नईची धुरा
आयपीएल २०२२मध्ये ‘या’ ३ परदेशी खेळाडूंना मिळू शकते दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिली पसंती