आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर खेळाडूने आपल्या जिल्ह्याकडून खेळण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. कारण ते आपले पहिले पाऊल असते आणि त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, असे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने म्हटले आहे.
धोनी हा थिरूवल्लूर जिल्हा क्रिकेट संघाच्या (टीडीसीए) रौप्य महोत्सवात सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपल्या जिल्ह्याकडून क्रिकेट खेळणे हे किती महत्वाचे असते, हे सांगितले आहे.
“भारतीय संघाचे नेतृत्व करायला मिळाले याचा मला गर्व आहे. पण मी माझ्या शाळेत, जिल्ह्याकडून खेळलो नसतो, तर आतापर्यंत इथवर आलो नसतो. यासाठी क्रिकेटपटूंनी त्यांच्या जिल्ह्याकडून क्रिकेट खेळणे आवश्यक आहे. तसेच आपला जिल्हा क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान असला पाहिजे”, असे धोनी (MS Dhoni) म्हणाला.
“आयुष्यात प्रथमच मी जिल्हा क्रिकेट संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा भाग झालो आहे. तसेच मी माझा जिल्हा रांची (झारखंड) यांचेही आभार मानतो,” असेही धोनीने म्हटले आहे. या कार्यक्रमामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे (आयसीसी) माजी अध्यक्ष श्रीनिवासन हे पण उपस्थित होते.
#ThalaDharisanam at Namma Singara Chennai! All smiles and happy vibes 💛#WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/hSFhsZul1O
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 1, 2022
झारखंडमधून आलेल्या धोनीने भारतीय संघात पदार्पण करण्याआधी त्याच्या फलंदाजी स्टाईल आणि यष्टीरक्षकांचे अप्रतिम कौशल्य यांकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
धोनीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व केले आहे. संघाने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ असे चार आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहेत. तर आयपीएल २०२२मध्ये त्यांचा संघ कर्णधारपदावरून चर्चेत राहिला. या हंगामात त्यांची निराशा झाली.
तसेच धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने २००७चा टी२० विश्वचषक, २०११चा वनडे विश्वचषक आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे तो आयसीसीच्या तीन चषक जिंकणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
धोनीने २००८-१४ दरम्यान भारतीय संघाचे ६० कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील २७ सामने जिंकले, १८ मध्ये पराभव तर १५ सामने अनिर्णीत राहिले. तसेच त्याने २०० वनडे सामन्यात कर्णधारपद सांभाळले आहे. त्यातील ११० सामने संघाने जिंकले, ७५ सामन्यांमध्ये पराभव, ५ सामने बरोबरीत सुटले तर ११ सामन्यांचा निकालच लागला नाही.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो’ म्हणाला होता, ‘माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल’; २ वर्षांनी बरोबर तसेच घडले
दीपक चाहर चढला बोहल्यावर, लाईव्ह सामन्यात मागणी घातलेल्या प्रेयसीबरोबर थाटला संसार, Photo व्हायरल
‘लॉर्ड’ ठाकूरच्या शब्दामुळे युवा स्पिनरला मिळाली आयपीएल पदार्पणाची संधी, स्वतः केला खुलासा