दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन याने गुरुवारी (18 मे) तुफानी खेळी केली. अवघ्या 49 चेंडूत क्लासेनने आपले शतक पूर्ण केले. इंडियन प्रीमियर लीगमधील हे त्याचे पहिलेच शतक ठरले. सनरायझर्स हैदराबाद संघ धावा करण्यासाठी झगडत असताना क्सासेन खेलपट्टीवर आला आणि त्याने हे शतक ठोकले. हैदराबाद संघाचा एकटा क्लासेनच होता, ज्याने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या गोलंदाजांचा घाम काढला.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आमना सामना झाला. नाणेफेक गमावल्यानंतर हैदराबादने प्रथम फलंदाजीचा केली. निर्धारित 20 षटकांमध्ये हैदराबादने 5 बाद186 धावा साकारल्या. यामध्ये हेनरिक क्लासेन (Heinrich Klassen) याचे योगदान सर्वात मोठे होते. क्लासेनने 51 चेंडूत 104 धावा केल्या आणि विकेट गमावली. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद संघासाठी हंगामातील हे दुसरे शतक ठरले आहे. याआधी हैरी ब्रुक याने आयपीएल 2023मध्ये हैदराबादसाठी पहिले शतक ठोकले होते. एकंदरीत विचार केला, तर क्लासेन हैदराबाकडून खेळताना शतक करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.
सनरायझर्स हैदराबादसाठी शतक करणारे फलंदाज
डेविड वॉर्नर
जॉनी बेअरस्टो
हॅरी ब्रुक
हेनरिक क्लासेन
(Maiden IPL hundred for Heinrich Klassen)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘करो या मरो’ सामन्यात आरसीबीने जिंकली नाणेफेक, हैदराबादचे दोन धुरंदर परतले मैदानात
‘सगळ्यांकडून शिकायचं आहे, पण अनुकरण नाही’, लखनऊचा कर्णधार कृणालची प्रतिक्रिया चर्चेत