---Advertisement---

पहिल्या टेस्टआधी टीम इंडियात मोठा बदल! बीसीसीआयने केली नवी यादी जाहीर

On: बुधवार, जून 18, 2025 10:26 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी आपल्या संघात बदल केला आहे. बोर्डाने आयएससीबाबत अधिकृत स्टेटमेंट देखील लागू केले आहे. पहिल्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात सहभागी करून घेतले आहे.

बीसीसीआयने (BCCI) आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे की, “पुरुष निवड समितीने इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे खेळले जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी हर्षित राणाला भारतीय संघात समाविष्ट केले आहे. भारत अ संघाचा भाग असलेला राणा पहिल्या कसोटी सामन्याची तयारी सुरू करण्यासाठी संघात सामील झाला आहे.”

23 वर्षीय हर्षित राणा यापूर्वी इंग्लंडमध्ये होता, त्याला इंडिया अ मध्ये स्थान देण्यात आले होते. त्याने इंट्रा-स्क्वॉडपूर्वी इंग्लंड लायन्स विरुद्ध एक सामना देखील खेळला होता. तो मंगळवारी संघासह लीड्समध्ये पोहोचला. सर्व खेळाडू लंडनहून लीड्सला ट्रेनने पोहोचले होते.

हर्षितने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (BGT) कसोटी पदार्पण केले होते. त्याने 3 डावात 3 बळी घेतले आहेत. पहिल्या कसोटीत तो प्लेइंग 11 मध्ये सामील होतो की नाही हे पाहावे लागेल. या संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, आकाश दीप आणि हर्षित राणा यांचा वेगवान गोलंदाज म्हणून समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---