---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! इंग्लंडला धक्का, तर भारतीय संघ पहिल्या पाचमधून बाहेर

On: गुरूवार, जानेवारी 8, 2026 11:22 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील अखेरच्या सामन्यात यजमान संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका 4-1च्या फरकाने जिंकली. सिडनी कसोटीत, कांगारू संघाला 160 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 31.2 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह, कांगारू संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे. यासह भारतीय संघ गुणतालिकेत कितव्या स्थानी आहे, पाहूया.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाने मालिका विजय मिळवल्याने त्यांनी गुणतालिकेतील आपलं पहिलं स्थान अधिक मजबूत केलं आहे. तर इंग्लंडलाही पराभवाचा मोठा फटका बसला आहे. तर भारतीय संघ टॉप-5 संघांमधूनही बाहेर झाला आहे.

सिडनी कसोटीनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेवर नजर टाकूया. 2025-27 चक्रातील आठ सामन्यांमधील ऑस्ट्रेलियाचा हा सातवा विजय आहे, ज्यामुळे त्यांचे एकूण 84 गुण असून 87.5 टक्केवारी आहे. इंग्लंडसाठी मात्र ही WTC सायकल एखाद्या वाईट स्वप्नासारखी आहे. गेल्या 10 सामन्यांमधील त्यांचा हा सहावा पराभव आहे. संघ फक्त 3 सामने जिंकू शकल्याने त्यांची टक्केवारी 31.66 आहे आणि संघ सातव्या स्थानावर आहे.

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. ज्यामध्ये संघाने 9 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 4 सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघाची टक्केवारी सध्या 48.16 टक्के असून संघ सहाव्या स्थानी आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी असून न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे

तेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत WTC 2025-27 मध्ये उत्तम कामगिरी केली आहे आणि 75 टक्केवारीसह संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ 66.67 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा संघ 50 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर बांगलादेश आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे 8 व्या आणि 9 व्या क्रमांकावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---