मागच्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे रविंद्र जडेजा टी-20 विश्वचषख खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी जडेजाला जवळपास पाच महिन्यांचा वेळ लागला. पण पुनरागमन मात्र त्याचे जबरदस्त राहिले. जडेजा भारतीय संघाच्या दिग्गज अष्टपैलूंपैकी एक आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव पाहता त्याला संघाचा उपकर्णधार बनवले पाहिजे, असे दिग्गज हरभजन सिंग याला वाटते.
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचे संघातीचे योगदान मोठे आहे. हरभनजने भारतासाठी 103 कसोटी सामन्यांमध्ये 417 विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे 269 आणि 25 विकेट्स आहेत. हरभजन सध्या संघातून बाहेर असून क्रिकेटविषयी नेहमीच व्यक्त होत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) याच्याकडून भारतीय संघाचे उपकर्णधारपद काढून घेतले गेले. अशात हरभजनच्या मते रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला भारताचा नवीन कसोटी उपकर्णधार म्हणून नियुक्त करता येऊ शकते. जडेजाला उपकर्णधारपद दिले गेल, तर तो अधिक गांभीर्याने स्वतःची भूमिका पार पाडेल, असे हरभनजला वाटते.
हरभजन सिंग यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “भारतीय संघाकडे सध्या उपकर्णधार नाहीये. नवीन उपकर्णधार कोण असेल? मला वाटते एक असा खेळाडू कर्णधार किंवा उपकर्णधार पाहिजे, जो प्लेइंग इलेव्हनमध्ये निश्चितपणे राहिला पाहिजे. मत सामना भारतात असो किंवा विदेशात. माझ्या मते रविंद्र जडेजा असाच खेळाडू आहे. नवा वाटेत संघाचे उपकर्णधारपद जडेजाकडे दिले पाहिजे. तो फलंदाजी आणि गोलंदाजीतील प्रदर्शनाच्या जोरावर सध्या सर्वोच्च स्थानी आहे.”
“जडेजापेक्षा चांगली अष्टपैलू जगात कुठे आहे, असे मला वाटत नाही. बेन स्टोक्स त्या लीगमध्ये आहे. तोदेखील मॅच विनर आहे खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाहिली, तर अप्रतिम आहे. असे वाटते की तो प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करू शकतो,” असेही हरभनज पुढे म्हणाला.
दरम्यान, जडेजाला आशिया चषक 2022 दरम्यान दुखापत झाली आणि त्याने ही स्पर्धा अर्ध्यातून सोडली. ऑगस्ट 2022 नंतर जेडजा दुखापतीच्या कारणास्तव थेड फेब्रुवारी 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसला. पुनरागमनाआधी जेडाजने सौराष्ट्रसाठी एक प्रथम श्रेणी सामना खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकला. त्या या सामन्यातील पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दिल्ली कसोटीत जडेजाने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 7 विकेट्स नावावर केल्या. (‘Make Ravindra Jadeja vice-captain of Team india’, Harbhajan Singh’s demand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीएवढे कसोटी षटकार माराणारा न्यूझीलंडचा गोलंदाज! इंग्लंडविरुद्ध खेळताना नावावर केला नवा विक्रम
‘धोनी माझा फोन 99% उचलणारच नाही’, विराटचा मोठा खुलासा