श्रीलंकेचा वनडे आणि टी20 क्रिकेटचा कर्णधार लसिथ मलिंगा 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 16 धावांनी पराभूत झाल्यानंतर बोलताना सांगितले की ‘विश्वचषकानंतर माझी क्रिकेट कारकिर्द संपणार आहे. मला टी20 विश्वचषक खेळायचा आहे. त्यानंतर मी निवृत्ती घेईल.’
मलिंगाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात रिझा हेंड्रिक्सला बाद करत टी20 मध्ये 97 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा शाहिद आफ्रिदीच्या नावावर असून त्याने 98 विकेट्स घेतल्या आहेत. आफ्रिदीचा हा विक्रम मोडण्यासाठी आता मलिंगाला केवळ दोन विकेट्सची गरज आहे.
मलिंगाने आत्तापर्यंत 218 वनडे सामन्यात 322 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 2007 च्या आयसीसी विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 चेंडूत 4 विकेट्स घेण्याचाही पराक्रम केला होता.
सध्या मलिंगाचे लक्ष हे मे मध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकावर आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सहा सामन्यांना मुकणार आहे.
श्रीलंकेच्या निवड समीतीने त्यांच्या खेळाडूंना विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी 4 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान होणाऱ्या सुपर प्रोविंशियल वनडे टूर्नामेंट या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे. यामुळे मलिंगाने या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे आणि या कारणामुळे मलिंगा आयपीएलमध्ये काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी चेन्नई – बेंगलोरचे असे आहेत ११ जणांचे संघ
–कोहलीच्या या गोष्टीची रिषभ पंतला वाटते सर्वात जास्त भीती
–सीएसकेच्या प्रशिक्षकांचा कोहलीला पाठिंबा, टीका करणाऱ्या गंभीरला दिले उत्तर






