भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँला एका २५ वर्षीय व्यक्तीने धमकी दिली होती. त्या व्यक्तीला कोलकाता पोलिसांनी बुधवारी (२५ नोव्हेंबर) पश्चिम बंगालमधून अटक केले.
एका अधिकाऱ्याने म्हटले की, हसीनने तक्रार दाखल केली होती. त्यावर कारवाई करत एका व्यक्तीला कॅनिंग स्टेशन रोड भागातून मागील दोन महिन्यांपासून अनेकवेळा धमकी देणारे फोन केल्यामुळे अटक केली. असा आरोप आहे की, त्या व्यक्तीने हसीनकडून पैसे मागितले होते.
आधी फोन कॉल्स केले दुर्लक्षित
पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, “हसीनच्या घरात काम करणाऱ्या महिलाने आधी फोन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्या मुलगा असण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने फोन केले.”
“तो पैसे मागत होता. पैसे न दिल्यामुळे त्याने धमकी दिली होती की, तो हसीनचे वैयक्तिक फोटो आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर पोस्ट करेल. त्या व्यक्तीने हसीनला शिव्याही दिल्या होत्या.”
हसीनने सुरुवातीला फोन कॉल्स दुर्लक्षित केले होते. परंतु जेव्हा हे रोज-रोज व्हायला लागले, तेव्हा २२ नोव्हेंबरला तिने तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, “जिथून फोन येत होता, तेथील दोन नंबर स्कॅन करून आम्ही मंगळवारी (२४ नोव्हेंबर) रात्री आरोपींना अटक केली. तपास सुरू केली आहे. आम्ही महिलेचा शोध घेत आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या-
उत्कंठा शिगेला! तब्बल २१ महिन्यांनंतर भारत- ऑस्ट्रेलिया येणार आमने सामने, रोहितची कमतरता भासणार?
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज
भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी