एक जून पासून मुंबई येथे आंतरखंडीय फुटबाॅल स्पर्धेला सुरवात झाली आहे. यामधे भारतासह तैवान, केनिया आणि न्यूझिलंड हे संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने सामन्यांवेळी मैदान ओस पडत होते.
यामुळे निराश झालेल्या भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीने भारतीय क्रिडा रसिकांना एका व्हिडीओ क्लीपच्या माध्यमातून मैदानांवर येऊन सामने पहाण्याचे अवाहन केले होते.
त्याच्या या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत निकुंज लोटिया या फुटबाॅल चाहत्याने चार जूनच्या भारत विरूध्द केनिया सामन्यासाठी मुंबई अरेना स्टेडिअमच्या एका संपूर्ण स्टँडची तिकिटे खरेदी करून ती प्रेक्षकांना मोफत वाटली.
त्याने १५० तिकीटे चाहत्यांना मोफत दिली. मुंबईकर निकुंज लोटिया हा युट्युबर म्हणुन भारतात ओळखला जातो.
सुनिल छेत्रीच्या या अवाहनाला टेनिसपटू सानिया मिर्झा, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सचिन तेंडूलकरने पाठींबा दर्शवीला आहे.
तसेच या स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत दहा जूनला होणाऱ्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
काल केनिया विरूध्द सुनिलने आपल्या कारकिर्दीतला शंभरावा सामना खेळण्याचा पराक्रम केला. या सामन्याच त्याने दोन गोल करत तो 61 गोलसह रोनाल्डे 81 आणि मेस्सी 64 यांच्यानंतर आंतराष्ट्रीय फुटबाॅलमधे सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत तीसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.
This is that guy who has bought an entire stand. Hantsoff. People in #Mumbai please go and support the team. #beyounick pic.twitter.com/f1I7ni5xAF
— ABHISHEK SINGH (@Abhishek_GTID) June 4, 2018
https://twitter.com/BadassAdian/status/1003286606508249090