प्रिमीयर लीगचा ९ वा आठवडा लीगच्या टेबल मध्ये काही उलटफेर तर काही अपेक्षित निकाल घेऊन आला. मॅन्चेस्टर युनाइटेडला हुडर्सफील्ड बरोबरच्या सामन्यात २-१ ने पराभवाला सामोरे जावे लागले. तर गतविजेत्या चेल्सीने वॅडफोर्डचा ४-२ असा पराभव केला. मॅन्चेस्टर सिटीने बर्नलीचा ३-० ने पराभव केला.
लीगच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मॅन्चेस्टर युनाइटेडला या मौसमातील आपल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. स्टार खेळाडू पोग्बाच्या अनुपस्थितीत युनाइटेडला बाॅलवर ताबा मिळवण्यात यश आले पण त्याचे गोल मध्ये रुपांतर करण्यात अपयश आले.
२७ व्या मिनिटाला मॅन्चेस्टर सिटीकडून यावर्षीच आलेल्या मुईने अप्रतिम रित्या रन करत बाॅल ईन्सकडे दिला पण त्याचा प्रयत्न डीगियाने परतवून लावला आणि तोच बाॅल परत मुईच्या ताब्यात जाऊन त्याने पहिला गोल केला.
पहिल्या गोलच्या अवघ्या ६ मिनिटानंतर हुडर्सफील्डच्या गोलकीकवर युनाइटेडचा डिफेंडर लिंडेलोफच्या चुकीने बाॅल डेपोट्रीच्या ताब्यात गेला आणि दुसरा गोल करत हुडर्सफील्ड ने २-० अशी बढत घेतली. विशेष म्हणजे लिंडेलोफ हा २३ व्या मिनिटाला जोन्स बाहेर गेल्याने बदली खेळाडू म्हणून संघात आला होता. ७८ व्या मिनिटाला लुकाकुच्या क्राॅसला हेडर मारत रॅशफोर्डने युनाइटेडचे खाते उघडले पण त्यांना एकच गोल वर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे गतविजेत्या चेल्सीने वॅडफोर्डचा शेवटच्या १०मिनिट मध्ये २ गोल करत ४-२ असा पराभव केला. हझार्डच्या असिस्टवर पेड्रोने १२ व्या मिनिटला गोल करत चेल्सीला १-० अशी बढत मिळवून दिली पण पहिल्या हाफच्या ४५+२(इंजुरी टाईम) मध्ये गोल करत वॅटफोर्डने १-१ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या हाफच्या ४ मिनिटानंतर अजुन १ गोल करत वॅटफोर्डने १-२ अशी बढत घेतली.
दुसऱ्या हाफ मध्ये ७१ व्या मिनिटाला पेड्रोच्या असिस्टवर बाटशुआईने चेल्सीतर्फे गोल करत २-२ अशी बरोबरी साधली. सामना संपायला अवघे काही मिनिट असताना चेल्सीने तिसरा गोल केला. तर ९०+५(इंजुरी टाईम) मध्ये परत बाटशुआईने गोल करत ४-२ अशी विजयी बढत घेतली.
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)