बऱ्याचदा लाईव्ह क्रीडा सामन्यात हृदयविकाराचा झटका आल्याने, चेंडू लागल्याने किंवा इतर कोणत्या गोष्टीमुळे क्रीडापटूंचा अकनाक मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. क्रिकेटमधील उदाहरण सांगायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाचा फिलिप ह्यूजेस याचा डोक्यावर चेंडू लागल्याने मृत्यू झाला होता. असेच काहीसे आता एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान घडले आहे. गावातील क्रिकेट स्पर्धेत खेळताना गुप्तांगाला चेंडू लागल्याने एका तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विक्रम श्रीरसागर असे या तरुणाचे नाव असून तो ३५ वर्षांचा होता. अशाप्रकारे इतक्या तरुण वयात अचानक विक्रमचे निधन झाल्याने परिसरात उडाली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे या क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेत विक्रम क्षीरसागर हा ३५ वर्षीय खेळाडू नेपातगाव या संघाकडून फलंदाजी करत होता. प्रतिस्पर्धी संघाच्या वेगवान गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने हा चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला आणि तो मैदानातच कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. विक्रमच्या मृत्यूने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांप्रमाणेच जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असतात. मात्र क्रिकेट खेळताना लागणारी संरक्षक साधने, गार्डस या गोष्टी खेळाडूंकडे नसल्याने असे दुर्दैवी प्रकार होत असतात. या पार्श्वभूमीवर तरुणांनी आपला जीव वाचवण्यासाठी क्रिकेट स्पर्धांमध्ये योग्य ती काळजी घेण्याची गरज असल्याचं पंढरपूरमधील घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतासाठी सोपा नसेल CWGचा अंतिम सामना, ऑस्ट्रेलियाकडून २ वर्षांपूर्वी मिळालेली भळभळती जखम
भारत वि. ऑस्ट्रेलिया संघात रंगणार गोल्ड मेडलचा अंतिम सामना, जाणून घ्या मॅचबद्दल सर्वकाही
CWG BREAKING: भारताची वाघीण दहाडली! विनेशने कायम राखली फोगट घराण्याची सुवर्ण परंपरा