संघाचे कर्णधारपद भुषविणे हे जर सन्मानाचे काम असते तसेच अनेक वेळा हे कर्णधारपद काटेरी मुकूटही ठरु शकतो. आजकाल क्रिकेट सामन्यात जिथे २७-२७ कॅमेरे लावले जातात तिथं एक-दोन कॅमेरे हे पुर्णवेळ कर्णधारावर असतात. अगदी क्रिकेट सुरु झाल्यापासून कर्णधारावर कायमच सर्वांचे लक्ष असते. एखादी चुक झाली तरी कर्णधाराला अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
असे असले तरी चांगली कामगिरी करणाऱ्या कर्णधाराला चाहते डोक्यावर घेतात. परंतु असे कधी ऐकले आहे का की कर्णधाराने चांगले निर्णय घेतले म्हणून त्याला सामनावीर पुरस्कार दिलाय? तर क्रिकेट इतिहासात असे आजपर्यंत दोन वेळा झाले आहे.
इंग्लिश कर्णधार बाॅब विलीस यांना कर्णधार म्हणून पहिल्यांदाच मिळाला सामनावीर
विश्वचषक १९८३मध्ये भारताने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या ट्राॅफीवर आपले नाव लिहीले. परंतु या विश्वचषकातील साखळी फेरीच्या सामन्यात एक मनोरंजक किस्सा घडला. विश्वचषकातील २१व्या साखळी फेरीतील २१व्या सामना श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात झाला.
जे मैदान गोलंदाजीला खूपच कमी मदत करणार आहे अशा मैदानावर तेव्हाच इंग्लिश कर्णधार बाॅब विलीसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी सर्वजण अवाक् झाले होते. हा निर्णय म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे होते. परंतु क्षेत्ररक्षणातील चातुर्याने त्यांनी श्रीलंका संघाला केवळ १३६ धावांवर रोखले.
यावेळी पाॅल एलाॅटने इंग्लंडकडून ३ विकेट्स तर फलंदाजीत ग्रॅमी फ्लाॅवरने ८१ धावा केल्या परंतु कर्णधाराने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे या सामन्यात बाॅब विलीसला सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले.
धोनी केवळ दुसराच कर्णधार
२०१२-१३ हंगामात पाकिस्तान संघ भारतात दोन टी२० व ३ वनडे सामने खेळण्यासाठी आला होता. यातील टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानंतर वनडे मालिकेत पाकिस्तानने २-० अशी विजयी आघाडी घेतली होती.
तिसरा व शेवटचा सामना ६ जानेवारी २०१३ रोजी दिल्ली येथे झाला. १.५ डिग्री सेल्सियसवर तापमान गेलेले असताना भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला व संपुर्ण संघ ४३.४ षटकांत १६७ धावांवर सर्वबाद झाला. एमएस धोनीने फलंदाजीत सर्वाधिक ३६ धावा केल्या.
पाकिस्तान संघ भारताला मालिकेत व्हाईट वाॅश देणार असे वाटत होते. त्यावेळी संघातील खेळाडूंना विजयासाठी प्रेरणा देण्याचे काम धोनीने केलेले. यावेळी धोनीने अचुक वेळी गोलंदाजीत बदल केला. तसेच अतिशय चतुराईने क्षेत्ररक्षण लावले. यामुळे पाहुण्या पाकिस्तान संघावर मोठा दबाव निर्माण झाला. याचा परिणाम असा झाला की भारताने हा सामना १० धावांनी जिंकला. इशांत शर्मा (३), आर अश्विन (२) व भुवनेश्वर कुमार (२) यांनी विकेट्स घेऊनही या सामन्यात धोनीला सामनावीर घोषीत करण्यात आले. Man of the Match for captaincy.
महत्त्वाच्या घडामोडी-
–आणि फिल्डरला अद्भुत कामगिरीसाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच
–एक नाही दोन नाही तर सगळ्या संघालाच जेव्हा दिली होती मॅन ऑफ द मॅच
–एकही विकेट, धाव किंवा झेल न घेणाऱ्या खेळाडूला जेव्हा मिळतो मॅन ऑफ द मॅच
–जेव्हा ग्राऊंड्समनला दिला होता मॅन ऑफ द मॅच पुरस्कार