ड्रीम क्लब आणि रेड डेविल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मँचेस्टर युनाइटेड संघाने यंदाचे डच चॅम्पियन असलेल्या एजाक्स फुटबॉल संघाला हरवून आपला पहिलावहिला यूईएफआ युरोपा करंडक जिंकला.
याबरोबरच आजपर्यंत त्यांनी ४३ मेजर विजेतेपद पटकावले आहेत. यूईएफआ युरोपा करंडक त्यांनी अगोदर पटकावले नव्हते.अंतिम सामना मँचेस्टर युनाइटेड संघाने २-० च्या फरकाने जिंकला.
सामना सुरू झाल्यावर दोन्ही संघाने आक्रमणे सुरू केली पण विक्रमी रक्कम देऊन याच सीज़नमध्ये संघात सामील केलेल्या मँचेस्टर युनाइटेडच्या मधल्या फळीतील खेळाडू पॉल पौग्बाने सामन्याच्या १८व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पौग्बाने बॉक्सच्या बाहेर फेल्लानीकडून मिळालेल्या पासवर लेफ्ट फूटी शॉट मारला तो एजॅक्स संघाच्या बचावपटुच्या पायाला लागून देफ्लेक्ट झाला आणि गोल जाळ्यात गेला.ही आघाडी हाफ टाइम पर्यंत तशीच रहिली.
विश्रांतीनंतर दुसऱ्या हाफचा खेळ चालू झाला तेव्हा एजॅक्स संघाने खेळ उंचावण्यासाठीचे प्रयत्न केले पण आक्रमणे करताना जो रिकामा स्पेस तयार होत होता त्याचा फायदा उठावत मँचेस्टर युनाइटेड संघाने ४८ व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. हा गोल याच सीज़नमध्ये संघात सामील झालेल्या हेंरिख मीखीतरीयान याने केला आणि संघाला २-० अशी बढ़त मिळवून दिली. हा मीखीयरीयान याचा या करंडकातील ६वा गोल होता आणि तो या करंडकात मँचेस्तेर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला.
दुसऱ्या गोल नंतर दोन्ही संघाने आक्रमणे वाढवली,गोल करण्याच्या खूप संधी बनविल्या पण गोल करू शकले नाहीत.अंतिम सामना 2-0 असा मँचेस्टर युनाइटेड संघाने जिंकला आणि करंडकावर आपले नाव कोरले.
सर आलेक्स फेर्गूसोन यांच्या मॅनेजर पद सोडल्यापासून मँचेस्टर युनाइटेडचा संघ मागील काही वर्षात चांगली कामगिरी करू शकत नव्हता.या सीज़नमध्ये त्यांनी कोच म्हणून जोसे मरीह्नो यांना आणले आणि त्यांनी नव्याने काही खेळाडू संघात सामील करून नव्याने संघ बांधणी केली आणि त्यांचा संघ परत चांगली कामगिरी करत आहे.
इंग्लीश प्रेमीअर मध्ये यंदा ६व्या क्रमांकावर असल्यामुळे मँचेस्टर युनाइटेड संघ यूईएफा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरत नव्हता. पण हा युरोपा लीग कप जिंकल्याने त्यासाठी पात्र ठरतील.