इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात पावसाचा सातत्याने व्यत्यय येत आहे. आत्तापर्यंत या विश्वचषकात झालेल्या 18 सामन्यांपैकी तब्बल 4 सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत.
त्यातील 7 जूनला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, 11 जूनला बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आणि 13 जूनला भारत विरुद्ध न्यूझीलंड हे तीन सामने तर नाणेफेक न होताच रद्द झाले. तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज संघातील सामना केवळ 7.3 षटकांचा खेळ होऊन रद्द झाला.
असे असतानाच 16 जूनला मॅनचेस्टर येथे होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचीच नजर आहे. पण या सामन्यावरही पावसाचे सावट असणार आहे. मॅनचेस्टरमध्ये आजही(14 जून) 11 डिग्री सेल्सियस तापमान असून पाऊस सुरु आहे.
त्याचबरोबर उद्याही मॅनचेस्टरमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच 16 जूनलाही मॅनचेस्टरमधील वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच या दिवशी कमाल तापमान 18 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 11 डिग्री सेल्सियस असण्याती शक्यता आहे.
तसेच वातावरणात 9 ते 40 टक्के ओलावा असू शकतो आणि पावसाच्या हलक्या सरीही येऊ शकतात. त्यामुळे हा सामना पूर्ण 50 षटकांचा न होता कमी षटकांचा होऊ शकतो.
भारत आणि पाकिस्तान आत्तापर्यंत विश्वचषकात 6 वेळा आमने-सामने आले आहेत. या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक२०१९: संघ पावसामुळे तर आयसीसी नेटीझन्सच्या गमतीशीर प्रतिक्रियांमुळे हैरान
–विश्वचषक २०१९: भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल कर्णधार विराट कोहली म्हणाला…
–जाणून घ्या, विश्वचषक इतिहासात एकही चेंडूचा खेळ न होता किती सामने झाले आहेत रद्द