जगातील सर्वात श्रीमंत क्लब पैकी एक आणि अफाट लोकप्रियता लाभलेला ब्रिटिश क्लब . खरे बोलायचे झाले तर हा महान खुळाडूंचा वारसा पुढे नेणारा क्लब ,प्रत्येकाचा ड्रीम क्लब म्हणून या क्लबची स्वतःची ओळख आहे . मारिन ड्राईव्ह वर गेल्या नंतर जसा प्रत्येक सिनेमा प्रेमी शाहरुख खान स्टाईल मध्ये आपले हात खोलून जसा म्हणतो की एक दिवस मी या शहरावर राज्य करेन एकदम तसेच प्रत्येक फुटबॉलरचे स्वप्न असते कि मी एक दिवस मँचेस्टर युनाइटेडसाठी खेळणार . जगाच्या काना कोपऱ्यात जिथे फुटबॉल खेळला जातो जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला मँचेस्टर युनाइटेड चे फॅन नक्की मिळतील.
१९५८ च्या विमान अपघातानंतर अशी एकही ट्रॉफी नाही जी मँचेस्टर युनाइटेडने जिंकली नाही . सर अॅलेक्स फेर्ग्युसन जेव्हा मॅचेस्टर युनाइटेडला कोचिंग करायचेतो काळ हा या क्लबचा सुवर्ण काळ असाच होता. आजचा दिवस ही मॅन युनाइटेडच्या इतिहासातील एक स्पेसिअल दिवस आहे .आज त्यांनी एएस रोमा या संघाला ७-१ अश्या मोठ्या फरकाने हरविले होते तेही चॅम्पियन ट्रॉफीच्या क्वाटर फायनलमध्ये आणि तेही पहिल्या लेगमध्ये १-२ पिछाडी असताना .
रोमाचा संघ दुसऱ्या लेगचा सामना खेळण्यासाठी मॅन युनाइटेडच्या घरच्या मैदानावर अर्थात फुटबॉलची पंढरी समजल्या जाणाऱ्या ओल्ड ट्रफेल्ड मैदानात आला . A S रोमा इटलीमधील संघ हा बचावर भर देऊन खेळणाऱ्या बाकीचा इटलीतील संघ सारखा नव्हता. तोही आक्रमणावर भर देणाऱ्या पैकीच एक होता . मैदान बाहेर तर चर्चा रंगली होती की आज कोणती टीम जास्त आक्रमण करणार व सामना खिशात घालणार . मॅन युनाइटेडकडे आक्रमणाची चांगली फौज होती .
सामन्याला सुरुवात झाली आणि पहिला अटॅक हा रोमाच्या टॉट्टीने केला पण बॉल गोल पोस्टच्या जवळून निघून गेला .गोलकिपर वॅन दार सार याला काही हात पाय चालवण्याची काही गरज पडली नाही . दहाव्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने राइट विंग वरून चाल रचत आक्रमक मिडफिल्डर असणाऱ्या मिचेल कॅरिककडे बॉल पास केला कॅरिकने बॉक्सच्या बाहेरून राइट फुटी शॉट मारत बॉल गोल जाळ्यात पोहोचवला आणि ११ व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल नोंदवला. जे काही अभूतपूर्व होणार होते त्याची ही सुरुवात होती . या गोलच्या अवघ्या सात मिनिटंनंतर मॅन युनाइटेडच्या होतकरू खेळाडू गिग्स याने डाव्या बाजूने चाल रचत बॉल बॉक्स मध्ये टाकला आणि तिथे तो पास अॅलन स्मिथने मिळवला आणि त्याचे रूपांतर गोल मध्ये केले . १८ महिन्याचा गोल न करण्याचा उपवास मोडला . पुन्हा एकदा आक्रमणाची धुरा मॅन युनिटेडच्या गिग्सने घेतली आणि बचाव फळीतील खेळाडूंना चुकवून बॉल सिक्स यार्ड बॉक्समध्ये टाकला आणि हाजीर तो रूनी या नवीन म्हणीप्रमाणे तिथे रूनीने बॉल गोल पोस्ट मध्ये पाठवला .१९ मिनिटात ३ गोल स्वीकारल्यामुळे रोमचा संघ बिथरला . ते त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकत नव्हते यात भर म्हणून की काय रोनाल्डोने स्वतः चाल रचत बॉक्समध्ये प्रवेश केला आणि त्यात बिथरलेल्या रोमच्या बचावपटूंनी त्याला शॉट मारण्याची संधी दिली . याचे फलित त्यांनी आणखी एक गोल स्वीकारला. फर्स्ट हाल्फच्या वेळेसचा स्कोर हा ४-० इतका झाला . प्रेक्षकांना समजले होते कि आपण आज एक वेगळ्याच प्रकारच्या हाय स्कोरिंग सामन्याचा आनंद घेत आहे.
दुसरा हाल्फ चालू होतोच गिग्सने सामन्याची सूत्र आपल्याकडे घेत चाल रचली आणि चेंडू सिक्स यार्ड बॉक्समध्ये क्रॉस केला .या वेळी अॅलन स्मिथ व रोनाल्डो सिक्स यार्ड बॉक्समध्ये होते, स्मिथ बॉलपर्यंत पोहचू शकला नाही पण रोनाल्डोने बॉलला गोलपोस्टची दिशा दिली आणि ४९ व्या मिनिटाला मॅन युनाइटेडचा सामन्यातील ५ वा गोल केला . सामना आता पूर्णपणे रोमाच्या हातुनच नाही तर पायातून हि निसटला होता. सामना इतका एकतर्फी होईल असे कोणाला वाटले ही नव्हते. काही मिनिटांनी कॅरिकने बॉक्समध्ये डाव्या बाजूने आत शिरत आणखी एक गोल केला जो सामन्यातील तोपर्यंतचा बेस्ट गोल होता . बॉल जबदस्त अँगल घेत गोल पोस्टच्या वरच्या कोपरात जाऊन थोडासा थिरावला .शेवटी म्हणतात ना डुबते को तिनकेका सहारा म्हणून कि काय रोमच्या रोस्सीने ६९ व्या मिनिटाला एक गोल केला . सामन्याचा निकाल तर लागलेला होताच पण सामन्याचा ८० व्या मिनिटाला इव्हाराने गोल करत रोमा सामन्यात डोकेवर काढणार नाही याची जबाबदारी घेतली .सामना ७-१ च्या स्कॉरे लाइनवर संपला . नवज्योत सिंग सिद्धू मानतात तसे यांनी आज गोल नाही केले तर गोलचा पाऊस पडला . खरे तर प्रेक्षक असेच सामने पाहण्यासाठी मैदानावर येत असतात .जर मॅन युनिटेडचा सुवर्ण इतिहास लिहला गेला तर एक संपूर्ण पान या सामन्यासाठी राखीव ठेवले जाईल .
आशा करू की मँचेस्टर युनाइटेड संघ पुन्हा त्या लयीमध्ये परत येईल आणि सामने आणि ट्रॉफी जिंकायचा धडाका सुरु करेल.