---Advertisement---

‘भावा तू भारतासाठी नक्की कधी खेळणार आहेस की तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल?’

On: गुरूवार, मे 20, 2021 10:42 PM
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. मागील काही वर्षापासून भारतीय संघात अनेक खेळाडूंनी पदार्पण केले. मात्र, त्यातील अगदी काहीच खेळाडूंना संघातील आपली जागा टिकवता आली. तर, अन्य खेळाडू बोटावर मोजण्याइतपत सामने खेळून पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये रमले. काही वेळा या खेळाडूंवर सोशल मीडियावरून टीकादेखील केली जाते. याचाच प्रत्यय यष्टीरक्षक सलामीवीर मनदीप सिंग याला नुकताच आला. एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत त्या चाहत्याची बोलती बंद केली.

चाहत्याने विचारला असा प्रश्न
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करणारा मनदीप सिंग जवळपास पाच वर्षापासून भारतीय संघाबाहेर आहे. याचमुळे एका चाहत्याने इंस्टाग्रामवरून मनदीपच्या २०१९-२०२० रणजी हंगामातील धावसंख्यांचा एक स्क्रीनशॉट पाठवून प्रश्न विचारला की, ‘तू भारतीय संघासाठी कधी खेळणार भाई की पुन्हा जन्म घ्यावा लागेल?’ यावर मनदीपने उत्तर देताना लिहिले, ‘एवढ्याने होणार नाही बडे भैया.’ वास्तवात, मनदीप याला देखील माहीत आहे की, भारतीय संघात समावेश होण्यासाठी किती मोठी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे अधिकाधिक चांगली कामगिरी करून त्याला भारतीय संघात जागा मिळवावी लागेल.

याच घटनेचा संबंध घेऊन आणखी एका चाहत्याने मनदीपसाठी भावनिक होऊन इक्बाल चित्रपटातील नसरुद्दीन शहा यांचा एक संवाद देखील ट्विट केला. तसेच, मनदीपचे भारतीय संघात पुनरागमन व्हावे म्हणून ईश्वराकडे प्रार्थना देखील केली.

भारतीय संघाचा भाग होता मनदीप
आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर २०१६ मध्ये झिम्बाब्वे दौर्‍यावर मनदीपने एमएस धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलमध्ये देखील तो पंजाब किंग्सचा सदस्य असून, त्याला स्थगित झालेल्या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय संघात एन्ट्री करण्यापूर्वी हा खेळाडू झाला होता आयएएसची परीक्षा पास, पदार्पणाच्या सामन्यातच ठोकले होते अर्धशतक

भारतीय संघात एन्ट्री करण्यापूर्वी हा खेळाडू झाला होता आयएएसची परीक्षा पास, पदार्पणाच्या सामन्यातच ठोकले होते अर्धशतक

पृथ्वी शॉकडे या गोष्टीची कमी, पाकिस्तानच्या क्रिकेटरने लक्षात आणून दिली शॉची मोठी चूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---