पुणे, 4 नोव्हेंबर, 2023: टेनिसनट्स यांच्या वतीने आयोजित व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या मानेग्रो नरेंद्र सोपल मेमोरियल टेनिस क्लब अजिंक्यपद 2023 स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पीवायसी अ व ब, टेनिसनट्स रॉजर, टेनिसनट्स राफा या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पाषाण येथील एनसीएल टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत योगेश पंतसचिव, अनिरुद्ध साठे, अभिषेक ताम्हाणे, अमोघ बेहेरे, पराग नाटेकर, ऋतू कुलकर्णी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी अ संघाने कोर्ट मॅजिशियन्स संघाचा 18-07 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात टेनिसनट्स रॉजर संघाने पीसीएलटीए संघाचा 18-04 असा पराभव केला. विजयी संघाकडून संदीप बेलोडी, जॉय बॅनर्जी, नितीन सावंत, रवी कोठारी, अमित किंडो, आलोक नायर यांनी सुरेख कामगिरी केली.
अन्य लढतीत पीवायसी ब संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा 18-06 असा तर, टेनिसनट्स राफा संघाने मुधोजी क्लब अ संघाचा 18-06 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेचे उदघाटन मानेग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश माने, कॅपोविटजचे संचालक समीर भामरे, टीइपी इंडियाचे गौतम सोपल आणि गंधार सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप बेलुडी, पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे आणि स्पर्धा संचालक सुधीर पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. (Mangrove Narendra Sopal Memorial Tennis Club Championship Tournament. PYC A & B, Tennisnuts Roger, Tennisnuts Rafa reach semi-finals)
निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
पीवायसी अ वि.वि.कोर्ट मॅजिशियन्स 18-07
(90 अधिक गट: योगेश पंतसचिव/अनिरुद्ध साठे वि.वि.सचिन माधव/गिरीश कुकरेजा 6-4; 60 अधिक गट: अभिषेक ताम्हाणे/अमोघ बेहेरे वि.वि.अजिंक्य पाटणकर/शिलादित्य बॅनर्जी 6-3; 80 अधिक गट: पराग नाटेकर/ऋतू कुलकर्णी वि.वि.जितेंद्र सावंत/मनिष टिपणीस 6-0);
पीवायसी ब वि.वि.महाराष्ट्र मंडळ 18-06 (90 अधिक गट: अमित लाटे/ध्रुव मैड वि.वि.अभिषेक चव्हाण/संजय सेठिया 6-0; 60 अधिक गट: सारंग देवी/संग्राम पाटील वि.वि.राजेंद्र देशमुख/कमलेश शहा 6-3; 80 अधिक गट: अमित नाटेकर/तन्मय चोभे वि.वि.अर्पित श्रॉफ/विक्रम श्रीश्रीमल 6-3);
टेनिसनट्स रॉजर वि.वि.पीसीएलटीए 18-04(90 अधिक गट: संदीप बेलोडी/जॉय बॅनर्जी वि.वि.कल्पेश मखानी/रवी जोकानी 6-0; 60 अधिक गट: नितीन सावंत/रवी कोठारी वि.वि.आशुतोष शर्मा/अनंत गुप्ता 6-1; 80 अधिक गट: अमित किंडो/आलोक नायर वि.वि.राजेश मित्तल/कुरियन टी. 6-3);
टेनिसनट्स राफा वि.वि.मुधोजी क्लब अ 18-06(90 अधिक गट: सुनील लुल्ला/अतुल करमपूरवाला वि.वि.अभिजित मोहिते/डॉ.नरेंद्र पवार 6-2;
60 अधिक गट: शशुक माने/सलील कुंचूर वि.वि.सौरभ खराडे/सूर्या निंबाळकर 6-0; 80 अधिक गट: चन्ना कुमार/अनिरुधा देवधर वि.वि.राहुल भोई/वरूण जाधव 6-4).
महत्वाच्या बातम्या –
७ नोव्हेंबर पासून रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा, महिंद्रा थार, ट्रॅक्टर सह विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट
पावसानंतर विजय पाकिस्तानच्या अजून जवळ, डीएलएसनुसार करायच्या आहेत फक्त ‘इतक्या’ धावा