पुणे । एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेने होत असलेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये अनिरूध्द चंद्रसेखर, मनीष सुरेशकुमार, आर्यन गोविस, चंद्रिल सुद या भारतीय दुसऱ्या फेरीत प्रवेश करत आजचा दिवस गाजवला.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथील टेनिस संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत भारताच्या मनिष सुरेशकुमार याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या अन्वित बेंद्रेचा ६-२,६-० असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताच्या अनिरूध्द चंद्रसेखरने कझाकस्तानच्या तिमुर खाबीबुलीनचा ४-६,६-४,६-३ असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. 1तास चाललेल्या सामन्यात अनिरुद्धने पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार कमबॅक करत पुढील दोन्ही सेट जिंकून विजय मिळवला. चंद्रिल सुदने वाईल्ड कार्ड द्वारे मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केलेल्या धृव मुळेचा ६-१, ६-३ असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
महाराष्ट्राच्या जागतिक क्र.867 असलेल्या आर्यन गोविस याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जर्मनीच्या व जागतिक क्र.480 असलेल्या तोबीस सिमोनचा टायब्रेकमध्ये ६-४,७-६(४) असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. हा सामना 1तास 19मिनिटे चालला. यावेळी आर्यन म्हणाला कि, मी सामन्यात खूप चांगला खेळ केला असून हा विजय माझ्यासाठी विशेष आहे. आर्यनने सामन्यात 2ब्रेक पॉईंट्ससह सातव्या गेममध्ये तोबीसची सर्व्हिस ब्रेक केली.
तसेच, पात्रता फेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या पुण्याच्या तेजस चौकुलकर याने यश चौरसीयाचा ६-३, ६-४ असा पराभव पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुख्य फेरी
अनिरूध्द चंद्रसेखर(भारत) वि.वि तिमुर खाबीबुलीन(कझाकीस्तान) ४-६,६-४,६-३
युसुके ताकाहाशी(जपान) वि.वि सिध्दार्थ विश्वकर्मा(भारत) ६-०,३-६,६-३
मनिष सुरेशकुमार(भारत) वि.वि अन्वित बेंद्रे(भारत) ६-२,६-०
रोमन ब्लोखीन(रशिया)वि.वि लक्ष्यीत सुद(भारत) ६-४,६-२
डॉनिलो कालेनिचेंको(युक्रेन)वि.वि निकी कलीयांदा पुनाचा(भारत) ७-६(३), ६-३
कॉल्वीन हेमर्री(फ्रान्स) वि.वि बोग्दन बोब्रो(रशिया)६-१,६-४
आर्यन गोवीस(भारत) वि.वि तोबीस सिमोन(जर्मनी) ६-४,७-६(४)
तोशीद मतसुई(जपान) वि.वि बेन पटाईल(इजराईल) ४-६, ६-३,६-४
चंद्रिल सुद(भारत) वि.वि धृव मुळे(अमेरीका) ६-१, ६-३
पात्रता फेरी
तेजस चौकुलकर(भारत) वि.वि यश चौरसीया(१)(भारत) ६-३, ६-४
दलविंदर सिंग(भारत) वि.वि सुरज प्रबोध(भारत) ६-४, ६-३