भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला आज कॅनबेरा येथे सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत केले. वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाने टी२० मालिकेला विजयी आरंभ केल. हा भारताचा ९ टी२० सामन्यातील सलग ९ वा विजय आहे. मात्र, या संघातील एक असा खेळाडू आहे जो संघात असताना मागील २० पैकी २० टी२० सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.
भारताची पहिल्या टी२० सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियावर मात
मनुका ओव्हलवर खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १६१ धावा काढून ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ५१ धावा ठोकल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४३ धावांची आक्रमक खेळी केली. प्रत्युत्तरात, भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीने ऑस्ट्रेलियाचा डाव १५० धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. भारताकडून युझवेंद्र चहल व टी नटराजन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. सामनावीराचा पुरस्कार चहलला देण्यात आला.
मनीष पांडे ठरतोय भारतीय संघासाठी लकी
टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघात मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेला संधी देण्यात आली होती. पांडेने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत ८ चेंडूत फक्त २ धावा केल्या. तो या सामन्यात अपयशी ठरला असला, तरी त्याच्या उपस्थितीचा फायदा भारतीय संघाला झाला. कारण मनीष पांडे सहभागी असलेल्या या सलग २० व्या सामन्यात भारतीय संघाने विजय साजरा केला आहे.
मनीष संघात असताना भारत ठरतोय अजिंक्य
दिनेश कार्तिकच्या ऐतिहासिक खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या २०१८ निदाहास ट्रॉफीपासून मनीषने भारतासाठी २० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे या २० सामन्यात भारताला एकदाही पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही. यास सर्व सामन्यांत मनीषची कामगिरी संमिश्र असली, तरी तो भारतासाठी भाग्यशाली ठरतोय हे नक्की. मागील वर्षी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या टी२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्या संघात मनीषचा समावेश नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बर्फ खांद्यावर काय करतोय, तो तर ग्लासमध्ये पाहिजे’, दोन जडेजांमधील चर्चेचा Video भन्नाट व्हायरल
Video: चेंडू लागला जडेजाच्या हेल्मेटला अन् त्रास झाला ऑस्ट्रेलियाला
‘गब्बर’ धवनची जुनी कमजोरी आली समोर; पाहा Video
ट्रेंडिंग लेख-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर