क्रिकेटच्या मैदानावर अनेक असे फलंदाज आहेत, जे आगळे वेगळे शॉट्स खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. असाच काहीतरी आगळा वेगळा शॉट राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला ५५ धाावांनी पराभवाचा सामना करावा लागला. परंतु मनीष पांडेने खेळलेल्या एका शॉटने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने जोस बटलरच्या १२४ धावांच्या खेळीच्या जोरावर २२० धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टो यांची जोडी मैदानात आली होती. तर गोलंदाजीची सुरुवात युवा कार्तिक त्यागीने केली होती.
त्याने पहिल्याच षटकात आपल्या वेगवान गोलंदाजीने हैदराबाद संघाच्या फलंदाजांना गुंतवून ठेवले होते. याच षटकातील पाचवा चेंडू कार्तिक त्यागीने वेगवान शॉर्ट चेंडू टाकला, ज्यावर मनीष पांडे गोंधळून गेला होता खेळू की सोडू? परंतु शेवटच्या क्षणी त्याने बॉलला बॅट लावली आणि क्रिकेट चाहत्यांना आगळा वेगळा अपर कट शॉट पाहण्याची संधी मिळाली. या चेंडूवर चौकार गेला. हे पाहून मनीष पांडे देखील आश्चर्यचकित झाला होता.
https://twitter.com/ribas30704098/status/1388855016643956736?s=20
https://twitter.com/lodulalit001/status/1388833267869175808?s=20
The talent of Manish Pandey: Looks like a fish out of water while batting but still scores a boundary
— Shubh Aggarwal (@shubh_chintak) May 2, 2021
Different Nataraja shot that, from Manish Pandey! The footwork 🤦🏽 😀#IPL2021 #SRHvRR #RRvsSRH
— Vincent Sunder (@vincentsunder) May 2, 2021
https://twitter.com/cricketist93/status/1388826218913406977?s=20
राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना, २० षटक अखेर ३ गडी बाद २२० धावा केल्या होत्या. यामध्ये जोस बटलरने महत्वाची खेळी केली होती. त्याने अवघ्या ६४ चेंडूत १२४ धावांची खेळी केली होती. तसेच कर्णधार संजू सॅमसनने ४८ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघातील मुख्य फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. या संघाकडून मनीष पांडेने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली होती. तर जॉनी बेअरस्टोने ३० धावा केल्या होत्या. इतर खेळाडूंना मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले होते.
राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत ६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर हैदराबाद संघ २ गुणांसह ८ व्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुल गंभीर आजारामुळे रुग्णालयात भरती, संघ मालकिण प्रीति झिंटाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
पृथ्वी शॉच्या विचित्र थ्रोमुळे रिषभ पंत घाबरला, ‘असा’ केला शेवटच्या क्षणी बचाव; पाहा तो प्रसंग
“नक्कीच सनरायझर्समध्ये कसली तरी डाळ शिजतेय,” वॉर्नरला संघाबाहेर केल्याने दिग्गजाचे मोठे वक्तव्य