सध्या भारतात विजय हजारे २०२१-२२ ट्रॉफी स्पर्धेचा (Vijay Hazare trophy) थरार सुरू आहे. या संपूर्ण स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून लवकरच उपांत्य फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. दरम्यान रविवारी (१९ डिसेंबर) उपांत्य पूर्व फेरीतील सामने पार पडले. ज्यामध्ये दुसऱ्या सामन्यात कर्नाटक आणि राजस्थान (Karnatak vs Rajasthan) हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात मनीष पांडेच्या (Manish Pandey half century) अर्धशतकी खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाने जोरदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
या सामन्यात कर्नाटक संघाने नाणेफेक जिंकून राजस्थान संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. राजस्थान संघाकडून प्रथम फलंदाजी करताना दीपक हुड्डाने (Deepak hudda) तुफानी खेळी करत १०९ धावा केल्या. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ५ षटकार मारले होते, तर समरप्रीत जोशीने ३३ धावांचे योगदान दिले होते. शेवटी रवी बिश्नोईने २ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १७ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला ४१.४ षटकात सर्वबाद केवळ १९९ धावा करण्यात यश आले होते.
कर्नाटक संघाचा यशस्वी पाठलाग
या धावांचा पाठलाग करताना, कर्नाटक संघाकडून कृष्णमूर्ती सिद्धार्थने ६ चौकारांच्या साहाय्याने ८५ धावांची खेळी केली, तर रविकुमार समर्थने ७ चौकारांच्या साहाय्याने ५४ धावांची खेळी केली. शेवटी मनीष पांडेने ४ चौकार आणि १ षटकारांचा साहाय्याने ५२ धावांची खेळी केली आणि कर्नाटक संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
— KSCAOfficial (@kscaofficial1) December 19, 2021
या संघांनी केला उपांत्य फेरीत प्रवेश
विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धेत लवकरच उपांत्य फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये उपांत्य फेरीतील पहिला सामना बुधवारी (२१ डिसेंबर) तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना याच दिवशी हिमाचल प्रदेश विरुद्ध उत्तर प्रदेश या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर उपांत्य फेरीतील तिसरा सामना बुधवारी (२२ डिसेंबर) सौराष्ट्र विरुद्ध विदर्भ या संघांमध्ये रंगणार आहे. तर उपांत्य फेरीतील चौथा सामना केरळ विरुद्ध सर्व्हिसेस या संघांमध्ये रंगणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बीसीसीआयपुढील अडचणीत वाढ? आयपीएलच्या मेगा लिलावास उशीर होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
वेगवान गोलंदाजीत हातखंडा असलेला इंग्लिश बॉलर अचानक करू लागला ऑफ स्पिन; पाहून आयसीसीही थक्क






