---Advertisement---

व्हि़डिओ: पांडे फलंदाजीत नाही पण क्षेत्ररक्षणात चमकला; घेतला एकहाती जबरदस्त झेल

---Advertisement---

राजकोट। आज(17 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा क्रिकेटपटू मनिष पांडेने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा जबरदस्त एकहाती झेल घेतला आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 340 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकात 341 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नरने मोहम्मद शमीने टाकलेल्या चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या पांडेने वर उडी मारत उजव्या हाताने तो चेंडू झेलला. त्यामुळे वॉर्नरला 15 धावांवरच त्याची विकेट गमवावी लागली. पांडेने घेतलेला हा झेल पाहून वॉर्नरही स्तब्ध झाला होता. तसेच भारतीय खेळाडूंनीही पांडेचे कौतुक केले.

https://twitter.com/genius18__/status/1218154121791967232

या सामन्यात वॉर्नर नंतर ऍरॉन फिंचला 33 धावांवर असताना रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर केएल राहुलने यष्टीचीत केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 बाद 82 धावा अशी झाली आहे.

तत्पूर्वी भारताकडून फलंदाजी करताना शिखर धवन(96), केएल राहुल(80) आणि विराट कोहलीने(78) अर्धशतकी खेळी केल्या. तसेच रोहित शर्माने 42 धावांची खेळी केली. मात्र मनिष पांडे(2) आणि श्रेयस अय्यर(7) यांना फलंदाजीत खास काही करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍडम झम्पाने 3 आणि केन रिचर्डसनने 2 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---