मागील अनेक महिन्यांपासून अन्य खेळांप्रमाणे कबड्डीचे सामने देखील स्थगित झाले. त्यामुळे या कालावधीदरम्यान प्रो कबड्डीतर्फे ‘बियाँड द मॅट’ हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. या कार्यक्रमातून आत्तापर्यंत अनेक खेळाडू चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रविवारी (११ ऑक्टोबर) अष्टपैलू कबड्डीपटू मनजीत चिल्लर उपस्थित होता.
यावेळी प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह पार पडलेल्या या कार्यक्रमात मनजीतने कबड्डीतील अनेक पैलूंवर भाष्य केले. यात त्याने ब्लॉक करण्यात हातखंडा कसा मिळवला याबाबतही सांगितले. त्याने ब्लॉक करण्याच्या शैलीबद्दल सांगितले की ‘सामन्यात खेळताना ब्लॉक योग्य व्हावा म्हणून कमीत कमी ५०० वेळा त्याचा सराव करतो. त्यामुळे सामन्यातील कोणत्याही परिस्थितीसाठी तयार होतो. तुम्ही जेवढा अधिक सराव कराल तेवढे अधिक यश तुम्हाला मिळते.’
याव्यतिरिक्त मनजीतने त्याच्या अष्टपैलू खेळाबद्दलही आपले मत व्यक्त केले. त्याला या कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आले की तो रेडिंग आणि डिफेन्स दोन्ही कसे करु शकतो. त्यावर तो म्हणाला, ‘जेव्हा मी घरी असतो, तेव्हा मी २-३ तास खेळतो. त्यावेळी मी कमीतकमी ६०-७० रेड करतो. त्यामुळे मी सामन्यात ३-४ रेड करण्यासाठी तयार होतो. मी सराव करताना खूपदा रेड करतो. कबड्डीमध्ये खूप कमी अष्टपैलू आहेत. त्यामुळे मला दोन्ही करण्याची संधी मिळते.’
मनजीतने प्रो कबड्डीमध्ये आत्तापर्यंत ४ संघांचे प्रतिनिधित्व केले असून १०८ सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण ५६३ गुण मिळवले आहेत. प्रो कबड्डीत सर्वाधिक ३३९ टॅकल पॉईंट्स आणि सर्वाधिक ३२४ यशस्वी टॅकलचा विक्रम मनजीतच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अशी आहे मनजीत चिल्लरची ड्रीम टीम; स्वत:लाही दिले स्थान
कोरोनानंतर कबड्डीचं होतंय पुनरागमन; ‘या’ राज्यात खेळवली जाणार स्पर्धा
ऐकावं ते नवलंच! त्याचा जर्सी क्रमांकच आहे त्याच्या घराचं नाव
ट्रेंडिंग लेख-
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
IPL 2020: दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यात रोहितसह ‘हे’ खेळाडू करु शकतात खास विक्रम
‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?