भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतल्यानंतर काय करणार, याचा खुलासा केला आहे. त्याला निवृत्तीनंतर १० मीटर रायफल शुटिंगमध्ये नशिब आजमवायचे आहे. ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
तिवारीने आउटलुक मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “तुम्ही मला १० मीटर रायफल शुटिंगमध्ये पाहू शकता. मी ऑलिंपिकमध्येही जाऊ शकतो. हे असे काही मला करायचे आहे. पण तुम्हाला माहिती आहे की, एका व्यक्तिवर इतर अनेक जबाबदाऱ्या असतात. तरीही मी प्रयत्न करेन की, माझ्या व्यस्त वेळापत्रकातून यासाठी कसा वेळ देता येईल.” Manoj Tiwari wants to represent india in olympic as 10m rifle shooter after cricket retirement.
तिवारी नुकत्याच रमजान ईदवरती दिलेल्या शुभेच्छांमुळे ट्रोल झाला होता. त्याने इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती प्रार्थना करतानाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे अनेक चाहते त्याची प्रशंसा करत होते. तर काहींनी त्याच्यावरती टिकाही केल्या होत्या.
तिवारीने भारताकडून १२ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले आहेत. २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या ७ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिवारीने वनडे आणि टी२०त मिळून एकूण ३०२ धावा केल्या आहेत.
२०११ ला चेन्नईतील चेपॉक स्टेडियम येथील वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात नाबाद १०४ धावा केल्या होत्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकमेव शतक होते. तर, २०१२ सालच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडेत त्याने ६५ धावा केल्या होत्या. हेही त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकमेव अर्धशतक होते.
तर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून १२५ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ८९६५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २७ शतकांचा आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय, तिवारी आयपीएलमध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली डेअरडेविल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
रोहितला ‘व्हाईट बॉल क्रिकेटचा डॉन ब्रॅडमन’ म्हणण्याचं कारणं नक्की आहे…
लक्ष्णवर चिडणं सचिनला पडलं होतं भलतचं महागात, मायदेशी…
गांगुलीला बीसीसीआयचा गाडा हाकण्यासाठी मिळणार हा डेप्युटी,…