देशांतर्गत क्रिकेटच्या 2018-19 या मोसमासाठी मनोज तिवारीची बंगाल संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
नुकतेच निवड समितीचे अध्यक्ष झालेले बंगालचे माजी कर्णधार पलाश नंदी पहिल्यांदाच शुक्रवारी संध्याकाळी बैठकीसाठी उपस्थित होते. तसेच त्यांनी संभावित 31 खेळाडूंची नावेही जाहिर केली आहेत.
या बैठकीसाठी तिवारीनेही प्रशिक्षक साईराज बहुतूले यांच्यासह हजेरी लावली होती. मात्र त्याने या मोसमात बंगालचे नेतृत्व करण्यास उत्साह दाखवला नाही.
याबद्दल निवड समितीच्या बैठकीनंतर तिवारी म्हणाला, “दुलिप ट्रॉफीच्या एकाही संघात माझी निवड न झाल्याने मी नक्कीच निराश आहे, पण म्हणून मी कधीही मला कर्णधारपदापासून मुक्त करा असे म्हटलो नाही. बंगालचे नेतृत्व करणे हा एक सन्मान आहे. तसेच वेगवेगळे चॅलेंज घेण्यासाठी मी कायम तयार असतो.”
अनेक मोसमांनंतर यावर्षी पहिल्यांदाच असे झाले आहे की बंगालने इतक्या लवकर कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे.
संभावित 31 खेळाडूंमध्ये वृद्धिमान सहा आणि मोहम्मद शमीचीही निवड झाली आहे. तसेच काही नावे वगळण्यात आली आहेत.
मान्सूनचा मोसम संपला सप्टेंबरपर्यंत की संघाची मैदानावरील सर्व कार्य सुरु होतील. तसेच शनिवारपासून इनडोअर सत्र आणि फिटनेसचे सत्र सुरु होतील.
याबरोबरच पुढच्या महिन्यात बंगाल क्रिकेट मंडळ संघाला सरावासाठी दक्षिणेत पाठवणार आहे. तिथे संघाला व्हिजन 2020 चे सल्लागार व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन आणि टीए सेकर हे संघात सहभागी होतील.
संभावित संघ:
मनोज तिवारी (कर्णधार), वृध्दिमान साहा, मोहम्मद शमी, अशोक दिंडा, सुदीप चॅटर्जी, अभिषेक रमन, कौशिक घोष, अभिमन्यु सहजान, विवेक सिंग,पुरब जोशी, अनुस्तुप मजूमदार, रिट्टीक चटर्जी, सत्यकी दत्ता, सुमंता गुप्ता, बी अमित, श्रीवत्स गोस्वामी, सायन शेखर मोंडाल, आयन भट्टाचार्जी, अमीर गाणी, प्रदिप्ता प्रामाणिक, प्रयाज राय बर्मन, शाहबाज अहमद,इशान पोरेल, आलोक प्रताप सिंग, मुकेश कुमार,सयन घोष, कनिष्क सेठ, अमित कुइला,वीर प्रताप सिंग, रित्विक रॉय चौधरी, प्रीतम चक्रवर्ती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–क्रिकेटचा प्रचार करण्यासाठी जपानची ही अनोखी कल्पना
–भारताचे फलंदाज-गोलंदाज चमकले, एकमेव सराव सामना अनिर्णित
–लार्ड्सवर कधीही न झालेली गोष्ट झाली, कित्येक वर्षाची परंपरा एमसीसीने केली स्थगित