रणजी ट्रॉफी २०२२चा पहिला उपांत्यपूर्व सामना बंगाल आणि झारखंड यांच्यात खेळला गेला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी बंगालने त्यांचा दुसरा डाव ७ विकेट्सच्या नुकसानावर आणि ३१८ धावांवर घोषित केला. अशाप्रकारे झारखंडला विजयासाठी एका सत्रात तब्बल ७९४ धावांचे लक्ष्य मिळाले, जे गाठणे अशक्य होते. बंगाल राज्याचा क्रीडामंत्री मनोज तिवारी या सामन्यात स्वतःच्या राज्याचे प्रतिनिधित्व करत होता आणि त्याने शतक देखील ठोकले.
एका सत्रात ७९४ धावा करायच्या असल्यामुळे सामना निकाली निघणार नव्हता. याच कारणास्तव झारखंड संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करणे उपयोगाचे समजले नाही. परिणामी सामना अनिर्णित झाला आणि बंगाल संघ उपांत्य सामन्यात पोहोचला. रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात मुंबई, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या संघांनी आधीच उपांत्य सामन्यात स्थान मिळवले होते. आता बंगाल उपांत्य सामन्यात पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे.
पहिल्या डावात बंगालने झारखंडविरुद्ध ७ विकेट्सच्या नुकसानावर ७७३ धावा करून डाव घोषित केला होता. प्रत्युत्तर झारखंड संघ पहिल्या डावात २९८ धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर बंगालने त्यांचा दुसऱ्या डावात ७ विकेट्सच्या नुकसानावर ३१८ धावा केल्या आणि डाव घोषित केला. दुसरा डाव घोषित करताना बंगालाचा आकाश दीप १३ धावांवर नाबाद होता. शाहबाज अहमदने ४६ धावांवर विकेट गमावल्यानंतर बंगालाने डाव घोषित केला.
बंगाल संघाचा फलंदाज आणि राज्याचा क्रीडामंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwari) या सामन्याचा चांगलाच चमकला. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या दुसऱ्या डावात मनोजने शतकीय खेळी गेली आणि स्वतःच्या संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. त्याआधी पहिल्या डावात मनोजने अर्धशतक (७३) ठोकले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे २८वे शतक ठरले.
1⃣0⃣0⃣ up for Manoj Tiwary as Bengal move closer to 240 in the second innings. #RanjiTrophy | #QF1 | #BENvJHA | @Paytm
Follow the match ▶️ https://t.co/UDFkFRkMjB pic.twitter.com/L65QSkUgu8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 10, 2022
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा अनुस्तूप मजूमदार २२ आणि मनोज तिवारी १२ धावांवर नाबाद खेळत होते, पण सामन्याच्या चौथ्या दिवशी अनुस्तूप ३८ धावा करून बाद झाला. त्यानंतर अशोक पोरलने ३४ धावांची खेळी केली, तर दुसरीकडे मनोज मात्र टिकून खेळत राहिला. त्याने या डावात १८५ चेंडू खेळले आणि १९ चौकार, २ षटकारांच्या मदतीने १३६ धावा केल्या. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात मनोजने केलेले हे दुसरे शतक ठरले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहली पत्नी अनुष्कासंगे लुटतोय सुट्ट्यांचा आनंद, समुद्रकिनारी घालवला वेळ
आयर्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेत बीसीसीआय ‘या’ खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता?