अलूरच्या क्रिकेट मैदानावर सध्या बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश संघात रणजी ट्रॉफी २०२१-२२चा पहिला उपांत्य फेरी सामना सुरू आहे. बंगालने बादफेरीत झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णीत राखत उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. बंगालच्या या यशामागे त्यांचा ३६ वर्षीय फलंदाज आणि बंगालचा क्रीडामंत्री मनोज तिवारी याच्या शतकी खेळीचा मोठा वाटा होता. बादफेरीनंतर उपांत्य फेरी सामन्यातही शतक ठोकत तिवारी चर्चेत आला होता. त्यातही त्याने शतकानंतर केलेले अनोखे सेलिब्रेशन आणखीनच लक्षवेधी ठरले आहे.
तिवारीने (Manoj Tiwary) महत्त्वाच्या उपांत्य फेरी सामन्यात शतक झळकावल्यानंतर भर मैदानात त्याचे प्रेम (Manoj Tiwary Expresses His Love) व्यक्त केले आहे. मध्य प्रदेशच्या ३४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगाल संघाला २७३ धावाच करता आल्या. बंगालच्या या डावात फक्त तिवारी आणि शाहबाज अहमद यांना मोठ्या खेळी करता आल्या. तिवारीने २११ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांच्या मदतीने १०२ धावांची शानदार खेळी (Manoj Tiwary Century) केली. हे त्याचे सलग दुसरे शतक ठरले.
या शतकी तडाख्यानंतर त्याने आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढली आणि ती सर्वांना दाखवत शतकाचा जल्लोष साजरा केला. त्याने या चिठ्ठीत त्याची पत्नी सुष्मिता रॉय आणि मुलाचे नाव लिहिले (Manoj Tiwary Celebration) होते. तसेच ‘आय लव्ह यू (माझे तुमच्यावर प्रेम आहे)’, असे लिहित मोठे हृदयही काढले होते. तिवारीच्या या अनोख्या जल्लोषाने सर्वांचे लक्ष वेधले असून त्याच्या चिठ्ठीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिवारीनेही या क्षणाचा व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.
I owe my life to U my love @roy_susmita7 ❤️ This one is for U. A small expression of LOVE and RESPECT for U. Thank u for the constant Support. Without ur love,Support and Sacrifice, nothing is easy for me to do at this point of time in my life 👍 I love u a lot ❤️🤗 pic.twitter.com/Cz7R3Cl7aU
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) June 16, 2022
Manoj Tiwary's message for wife and family after scoring probably one of his best hundreds in Ranji Trophy. pic.twitter.com/nTsVkEps6f
— Aritra Mukherjee (@aritram029) June 16, 2022
https://twitter.com/Sportizens_in/status/1537332877393727488?s=20&t=LUMfrZbMgwvilj2fWTgTnw
तिवारीव्यतिरिक्त शाहबाज अहमदनेही शतक केले. त्याने २०९ चेंडू खेळताना १२ चौकारांच्या मदतीने ११६ धावा केल्या. तत्पूर्वी मध्यप्रदेशकडून यष्टीरक्षक फलंदाज हिमांशू मंत्रीने १६५ धावांची खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले होते. पहिल्या डावात मध्य प्रदेश संघाने ६८ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही मध्य प्रदेशचा संघ २३५ धावा करत मजबूत स्थितीत आहे. सध्या मध्य प्रदेशकडे ३०३ धावांची आघाडी आहे.
कशी राहिलीय मनोज तिवारीची प्रेमकहाणी
तिवारी आणि सुष्मिता यांची पहिली भेट २००६ साली झाली होती. तत्पूर्वी दोघांनी ६ वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. सुष्मिता उत्तर प्रदेशची राहणारी आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेचे धमाकेदार पुनरागमन, ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे जिंकत मालिकेत साधली बरोबरी
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वीच आयर्लंडच्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, वाचा सविस्तर
‘त्याचा सामना करणे कधीच सोपे नव्हते…’, ऑस्ट्रेलियन स्पिनर वाढवतो भारतीय दिग्गजाच्या अडचणी