---Advertisement---

Video: ऑलिम्पिक उद्घाटनात डौलाने फडकला तिरंगा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारताचे नेतृत्व

---Advertisement---

जगातील सर्व क्रीडास्पर्धांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकचे शुक्रवारी (२३ जुलै) बिगुल वाजले. जपानची राजधानी टोकियो येथे ही स्पर्धा सुरु झाली. कोरोनाचे सावट असल्या कारणाने यावेळी स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच वेळी, स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात परंपरेनुसार सर्व देशांच्या खेळाडूंचे संचलन पार पडले. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाने सहभाग नोंदवला.

थाटात पार पडले ऑलिम्पिकचे उद्घाटन
नियोजित कार्यक्रमानुसार २०२० मध्ये होणारी ही ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलून आयोजित केली जात आहे. या वर्षी देखील कोरोणाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने अनेक निर्बंधांसह स्पर्धा पार पाडावी लागेल. उद्घाटन सोहळ्यात प्रत्येक देशातर्फे केवळ निवडक खेळाडू व प्रशिक्षकांना संचलनात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली.

मेरी कोम व मनप्रीतने केले भारताचे नेतृत्व
उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकातर्फे २६ सदस्य संचलनात सहभागी झाले. यामध्ये २० खेळाडू व ६ अधिकाऱ्यांचा समावेश होता. भारताच्या पथकाचे ध्वजवाहक म्हणून २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारी बॉक्सर मेरी कोम व हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना संधी मिळाली. यावेळी भारतीय संघाने विशिष्ट भारतीय पेहराव केला होता. ध्वजवाहक मनप्रीत पारंपारिक पंजाबी पगडीमध्ये दिसून आला. इतर सर्व खेळाडूंनी आपआपल्या हातात छोटा-छोटा तिरंगा घेतला होता.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे सर्वात मोठे पथक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आजवरचे सर्वात मोठे पथक सहभागी होणार आहे. यामध्ये, १२७ खेळाडू ८४ मेडल इव्हेंट्समध्ये सहभागी होतील. समावेश असेल. जगभरातील २०५ देशांमधील तब्बल अकरा हजार खेळाडू पदकांसाठी प्राणपणास लावतील. या वर्षी भारतीय संघाला कमीत कमी १० पदके मिळवण्याची आशा आहे.

भालाफेकपटू नीरज चोप्रा, तिरंदाजीपटू दीपिका कुमारी, कुस्तीपटू बजरंग पुनिया व विनेश फोगट यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील. नेमबाजीत भारताला चार पदके मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंना धवनने श्रीलंकेतून दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

श्रीलंकाचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात वादादरम्यान काय झाले होते बोलणे? वाचा सविस्तर

Video: नाणेफेक जिंकल्यानंतर उरला नाही ‘गब्बर’च्या आनंदाला पारावार, केले भन्नाट सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---