Neeraj Chopra Meets Manu Bhaker’s Mom : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला केवळ 6 पदके मिळाली. यामध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि नेमबाज मनू यांच्या पदकांचाही समावेश आहे. मनूने नेमबाजीत वैयक्तिक कांस्यपदक जिंकले आणि मिश्र क्रीडाप्रकारात सरबज्योत सिंगसोबत मिळून आणखी एक कांस्यपदक मिळवून दिले. तर भालाफेकपटू नीरजने रौप्यपदकाची कमाई केली.
आता पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोपानंतर नीरज आणि मनू भाकरच्या आईचा भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओखाली नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया उमटत आहेत.
Look at the confidence of our medalists Neeraj Chopra and Manu Bhaker both can’t look each other in the eyes while talking pic.twitter.com/fMc2ACDPaT
— Yanika_Lit (@LogicLitLatte) August 11, 2024
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मनू भाकरची आई सुमेधा भाकर भालाफेकपटू नीरजशी बोलत आहेत. यादरम्यान त्या नीरजचा हात आपल्या हातात घेतात आणि डोक्यावर ठेवतात. त्यांचे बोलून पाहून अनेकांनी मनू आणि नीरजचे लग्न पक्के झाल्याच्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनूच्या आईबरोबर मनू आणि नीरजचा एकमेकांशी बोलतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओत दोघेही एकमेकांना संवाद लाजताना खूप लाजताना दिसत आहेत.
Manu Bhaker’s mother having a chat with Neeraj Chopra. pic.twitter.com/Zh10VCsiZA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 12, 2024
Manu Bhaker’s mother having a chat with Neeraj Chopra. pic.twitter.com/Zh10VCsiZA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 12, 2024
नीरजने मनूच्या आईसोबत केलेल्या संवादाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले, “रिलेशनशिप कन्फर्म झाले.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “सिधा ही रिश्ता कर दिया क्या इसका.” आणखी एका युजरने अशाच विनोदी पद्धतीने लिहिले की, “बेटा तू किती हुंडा घेणार?” त्याचप्रमाणे लोकांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्येभारताला नेमबाजीच्या स्पर्धेत तीन पदकं मिळाली. भारताची महिला नेमबाज मनू भाकरनं ऐतिहासिक कामगिरी करत दोन कांस्य पदकांवर निशाणा साधला. तर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र क्रीडाप्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत सरबज्योत सिंग-मनू भाकर जोडीनं कांस्य पदक पटकावलं. तर भालाफेकीच्या अंतिम सामन्यात नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर फेक केली आणि रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
WI vs RSA पहिला कसोटी सामना रद्द! भारताचं WTCच्या गुणतालिकेत मोठं नुकसान?
किती वर्षांनी कर्णधार रोहितचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन? जाणून घ्या एका क्लिकवर
नेपाळची क्रिकेट टीम करणार भारताचा दौरा, टीम इंडियाविरुद्ध मॅच खेळणार का?