वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल झाला. हा उलटफेर झाल्यामुळे भारतीय संघाचे नुकसान झाले का? दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे भारताय संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत काहीच नुकसानं झालं नाही. या सामन्यापूर्वीही भारतीय संघ पहिल्या स्थानावर होता आणि आताही पहिल्याच स्थानावर आहे. भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25च्या फेरीत आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने 9 पैकी 6 सामने जिंकले, 2 सामने गमावले आणि 1 सामना अनिर्णित राहिला. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 68.51 आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघ संघ तळाशी आहेत. आफ्रिका 7व्या स्थानावर आहे, तर वेस्ट इंडिज 9व्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेनं या फेरीत आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 1 सामना जिंकला, 3 गमावले आणि 1 अनिर्णित राहिला. आफ्रिकेची विजयाची टक्केवारी केवळ 26.67 आहे. तर वेस्ट इंडिजनं 2023-25 च्या फेरीत आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 1 सामना जिंकला, 5 गमावले आणि 2 अनिर्णित राहिले.
सध्या भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडनं आतापर्यंत 6 सामने खेळले असून, 3 जिंकले आणि 3 गमावले. त्यानंतर श्रीलंका चौथ्या स्थानावर आणि पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
किती वर्षांनी कर्णधार रोहितचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन? जाणून घ्या एका क्लिकवर
नेपाळची क्रिकेट टीम करणार भारताचा दौरा, टीम इंडियाविरुद्ध मॅच खेळणार का?
160 फुटांवरून उडी मारली, बाईकसह विमानात चढला…समारोप सोहळ्यात टॉम क्रूझची तुफान स्टंटबाजी!