---Advertisement---

शब्बास रे पठ्ठ्यांनो!! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना अनिर्णित झाल्यावर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव

On: सोमवार, जानेवारी 11, 2021 2:36 PM
---Advertisement---

सिडनी। भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेला तिसरा कसोटी सामना सोमवारी(११ जानेवारी) अनिर्णित राखण्यात यश मिळवले. या सामन्यात चौथ्या दिवसाखेरपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व होते. पण सोमवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघाने धैर्य दाखवले आणि सामना अनिर्णित राखला. त्यामुळे सध्या भारतीय संघाचे खुप कौतुक होत आहे.

भारतीय संघाची चिवट झुंज – 

या सामन्यात पाचव्या दिवशी भारतासमोर ३०९ धावा करण्याचे आव्हान होते. तसेच भारतीय संघाच्या हातात केवळ ८ विकेट्स बाकी होत्या. त्यातही रविंद्र जडेजाचा अंगठा फ्रॅक्चर असल्याने तो फलंदाजी करण्याची शक्यता कमी होती अशा परिस्थितीत भारतीय संघाने लढावू वृत्ती दाखवली. पाचव्या दिवशीच्या सुरुवातीलाच कर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट गेल्याने अनेकांना हा सामना भारताच्या हातून निसटला, असे वाटत होते.

मात्र, भारतीय संघाकडून रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने चौथ्या विकेटसाठी दमदार शतकी भागीदारी उभारली. या दोघांनीही १४८ धावांची भागीदारी करताला भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण पंत ९७ धावांची तुफानी खेळी करुन तर पुजारा ७७ धावांची खेळी करुन दुसऱ्या सत्रात बाद झाले. त्यामुळे या सामन्यात रोमांच आला.

त्यातही पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर खेळणाऱ्या आर अश्विन आणि हनुमा विहारी जोडीसमोर नवीन समस्या आली ती दुखापतीची. फलंदाजी करत असतानाच विहारीला हॅमस्ट्रिंगचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे त्याने मैदानावर उपचार घेतले आणि लढावू वृत्ती दाखवत खेळणे कायम केले. आर अश्विन आणि विहारी या जोडीने शेवटपर्यंत झुंज दिली आणि २५० पेक्षाही अधिक चेंडू खेळून काढत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. याबरोबरच त्यांनी हा सामना अनिर्णित राखत भारताचे या मालिकेतील आव्हान कायम ठेवले.

भारतीय संघाने दाखवलेल्या या लढावू वृत्तीबद्दल प्रत्येकजण कौतुक करत आहे.

भारतीय संघाचे होतंय कौतुक –

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे की, ” भारतीय संघाचा अभिमान वाटत आहे. विशेषत: रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन आणि हनुमा विहारी – त्यांनी त्यांच्या भूमिका शानदार निभावल्या. तुम्हाला काय वाटते कोणत्या ड्रेसिंग रुमचा आत्मविश्वास वाढला असेल.”

भारतीय संघाचे कौतुक करताना व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी म्हटले आहे की “काय शानदार कामगिरी होती भारतीय संघाची. अनेक दुखापतींचा सामना करुनही आणि प्रमुख खेळाडू संघात नसतानाही दबावाखाली देखील उत्तम लढावू वृत्ती दाखवली. वाह!”

मोहम्मद कैफने ट्विट केले आहे की ‘सामना अनिर्णित राखण्याचा भारताचा जबरदस्त प्रयत्न. संघाने दाखवलेले धैर्य आणि जिद्द अफलातून होती, विशेषत: पुजारा, पंत, विहारी आणि अश्विन.”

https://twitter.com/MohammadKaif/status/1348531300055977986

भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने एक मीम शेअर करत भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

बीबीआयचे सचिव जय शहा यांनी देखील भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

अजित अगरकरने म्हटले आहे की, ‘काय शानदार कामगिरी केली या भारतीय संघाने”

इतरही आजी-माजी क्रिकेटपटूंनी केले कौतुक –

भारताचा कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“हाताचं प्रत्येक बोट वेगवेगळं काम करत, अगदी तसंच..” सचिनकडून पुजारा-पंतवर कौतुकाची थाप

टीम इंडियाकडून ‘द वॉल’ला त्याच्याच शैलीत बर्थडे गिफ्ट! ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ड्रॉ करण्यात भारताला यश

टीम इंडियाला चौथ्या डावात २०० धावाही करता येणार नाही म्हणणाऱ्या ‘त्या’ दिग्गजाला सणसणीत चपराक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---