---Advertisement---

असं पहिल्यांदाच घडतंय! आयपीएलमध्ये खेळणार थेट जुळ्या भावांची जोडी; मुंबईने दिली संधी

On: शुक्रवार, डिसेंबर 23, 2022 11:01 PM
---Advertisement---

कोची येथे शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) आयपीएल 2023चा मिनी लिलाव पार पडला. या मिनी लिलावात काही खेळाडूंची चांदी झाली, तर काही बड्या खेळाडूंमध्ये कोणीही रस दाखवला नाही. त्याचवेळी अद्याप दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या प्रतीक्षेत असलेला युवा वेगवान गोलंदाज डुआन जेन्सन याला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. विशेष म्हणजे डुआन हा दक्षिण आफ्रिकेचा युवा अष्टपैलू मार्को जेन्सन याचा जुळा भाऊ आहे.

 

कोची येथे झालेल्या आयपीएल लिलावात अनेक विदेशी अनकॅप्ड खेळाडूंनी देखील नावनोंदणी केली होती. दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज डुआन जेन्सन याचे देखील यामध्ये नाव होते. मुंबई इंडियन्सने त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर आपल्या संघात सामील करून घेतले. डुआनचा जुळा भाऊ मार्को हा मागील वर्षापासून सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे. त्याला 4 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम मिळाली होती. आता डुआन हा देखील आयपीएलचा भाग झाल्याने, दक्षिण आफ्रिकेची ही जुळ्या भावांची जोडी पहिल्यांदाच आयपीएल खेळताना दिसू शकते.

डुआन हा आयपीएल 2022 आयपीएलवेळी मुंबई इंडियन्स संघाचा नेट बॉलर देखील होता. याआधी मार्को व डुआन हे देखील मुंबई इंडियन्सच्या अकॅडमीत दिसून आले होते. सध्या मार्को हा दक्षिण आफ्रिकेच्या तिन्ही प्रकारच्या संघाचा प्रमुख खेळाडू आहे.

दुसरीकडे, डुआन याने यावर्षी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट नेविस ऍण्ड पॅट्रिएट संघात दिसला होता. तर, दक्षिण आफ्रिकेमध्ये तो नॉर्थ वेस्ट संघाचे प्रतिनिधित्व करतो.

(Marco Jansen Twin Brother Duan Jansen Sold In IPL 2023 Auction)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---