भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरुवात होणार आहे. हा सामना दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात फलंदाज मार्कस हॅरिसचा समावेश करण्यात आला आहे. ट्वीट करत आयसीसीने याची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा धडाकेबाज खेळाडू डेविड वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की पहिल्या कसोटी सामन्यासाठी अनुपस्थित असल्यामुळे हॅरिसला संघात सामील करण्यात आले आहे.
JUST IN: Marcus Harris has been added to the Australia squad for the Adelaide Test ➕
He has been drafted in following confirmation of David Warner and Will Pucovski's unavailability for the first match. #AUSvIND pic.twitter.com/Fgd9dzGPWa
— ICC (@ICC) December 12, 2020
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वॉर्नरला दुखापत झाली होती, तर पुकोव्हस्कीच्या डोक्याला चेंडू लागला होता. त्यामुळे आता दोन्ही खेळाडू लवकर पुनरागमन करतील, असे म्हटले जात आहे.
हॅरिसने आतापर्यंत ९ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आणि मागील वर्षी इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेत तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता.
विशेष म्हणजे त्याने या हंगामात शेफील्ड शिल्डमध्ये व्हिक्टोरियाकडून खेळताना केवळ २ सामन्यात ११८.३३ च्या सरासरीने ३५५ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३९ धावांची द्विशतकी सर्वोच्च खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडला दणका! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून २ मोठे खेळाडू बाहेर
हम खुद के फेवरेट है.! ऐतिहासिक खेळीनंतर बुमराहचं स्वतःसाठी खास ट्विट
कसं काय, हार्दिक भाऊ? पंड्याचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
…तर बाबरने विराटकडून घ्यावे धडे; माजी दिग्गजाने मांडले मत
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘हे’ ३ गोलंदाज लढवणार भारताची खिंड; स्पिनरचाही समावेश
भारतीय संघाची अष्टपैलूची चिंता कोण मिटवणार? ‘या’ ५ खेळाडूंचे आहेत पर्याय