ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू मार्कस स्टोइनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्टोइनिसची निवड करण्यात आली होती. पण त्याने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. याचा अर्थ असा की आता ऑस्ट्रेलियाला त्याच्या जागी दुसरा खेळाडू निवडावा लागेल. स्टोइनिस सध्या SA20 मध्ये डर्बन सुपर जायंट्सकडून खेळत आहे.
आता स्टोइनिसच्या निवृत्तीनंतर, त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात दुसऱ्या खेळाडूला स्थान देण्यात येईल. सर्व संघ 12 फेब्रुवारीपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बदल करू शकतात. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
स्टोइनिसबद्दल बोलायचे झाले तर, 2023 मध्ये भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात तो ऑस्ट्रेलियाच्या विजेत्या संघाचा भाग होता. ऑस्ट्रेलियाकडून व्हाईट बॉल क्रिकेट खेळणारा स्टोइनिस आता केवळ टी20 क्रिकेट खेळत राहील. त्याच्या एकदिवसीय निवृत्तीबद्दल बोलताना, स्टोइनिसने बोर्डाला सांगितले की, “ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणे हा एक अद्भुत प्रवास होता आणि मी हिरव्या आणि सुवर्ण वातावरणात घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञ आहे. सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अशी गोष्ट आहे जी मी नेहमीच लक्षात ठेवेन.”
स्टोइनिस पुढे म्हणाला, “हा निर्णय सोपा नव्हता, पण मला वाटते की एकदिवसीय क्रिकेटपासून दूर जाऊन माझ्या कारकिर्दीच्या पुढील अध्यायावर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे. रॉन (ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड) यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत आणि मी त्यांच्या पाठिंब्याचे कौतुक केले आहे. मी पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देईन.”
मार्कस स्टोइनिसने त्याच्या कारकिर्दीत 71 एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांच्या 64 डावांमध्ये त्याने 26.69 च्या सरासरीने 1495 धावा केल्या. ज्यामध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच स्टोइनिसचा सर्वोच्च स्कोअर 146* धावा होता. याशिवाय, 64 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 43.12 च्या सरासरीने 48 विकेट्स देखील घेतल्या. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 3/16 अशी होती.
???? MARCUS STOINIS RETIRED FROM ODI FORMAT. ???? pic.twitter.com/2Xr6Xez7Dv
— Johns. (@CricCrazyJohns) February 6, 2025
हेही वाचा-
राहुल की रिषभ पंत, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असेल विकेटकीपर? रोहित म्हणाला, ‘दोघांमध्येही सामना….
टीम इंडियाचे पुढचे विराट कोहली-रोहित शर्मा कोण असतील? माजी प्रशिक्षकाने या खेळाडूंना निवडले
अविश्वसनीय! सुपर किंग्जच्या खेळाडूने घेतला सुपरमॅन स्टाईलमध्ये अशक्य झेल, VIDEO






