---Advertisement---

स्टॉयनिसच्या वादळात उडाली श्रीलंका! तुफानी अर्धशतकाने विजय टाकला ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात

On: मंगळवार, ऑक्टोबर 25, 2022 8:06 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात मंगळवारी (25 ऑक्टोबर) यजमान ऑस्ट्रेलिया व आशियाई विजेते श्रीलंका यांच्या दरम्यान सामना झाला. कोणत्याही परिस्थितीत विजय हवा असलेल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत श्रीलंकेला 157 धावांवर रोखले. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ काहीसा अडचणीत आला होता. मात्र, अखेरीस आपल्या अनुभवाचा फायदा घेत त्यांनी श्रीलंकेला 7 गडी राखून पराभूत करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले.

https://twitter.com/ICC/status/1584914611530252289?t=dfDuOunLVQGGJiBNSVYsgQ&s=19

 

न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य होते. पर्थ येथील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कुसल मेंडिसला दुसऱ्या षटकात तंबूत धाडले. दुसऱ्या गड्यासाठी निसंका व धनंजय डी सिल्वा यांनी 69 धावांची शानदार भागीदारी केली. त्यांनी अनुक्रमे 40 व 26 धावा केल्या. अखेरीस चरिथ असलंकाने 25 चेंडूवर 38 धावा करत संघाला 157 पर्यंत मजल मारून दिली.

‌‌ या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला वॉर्नर व फिंचने 26 धावांची सलामी दिली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले होते. वॉर्नर बाद झाल्यानंतर फिंच धावांसाठी संघर्ष करताना दिसला. मिचेल मार्शने 17 धावाांच योगदान दिले. त्यानंतर आलेेल्या ग्लेन मॅक्सवेल याने आक्रमक फलंदाजी करताना 12 चेेंडूवर 23 धावा करत सामन्याचा वेग वाढवला. तो बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संकटात सापडली होती. मात्र, मार्कस स्टॉयनिसने आल्याआल्या षटकार चौकारांची बरसात करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुढे नेऊन ठेवले. हसरंगा व तिक्षणा यांच्यावर त्याने हल्ला चढवत केवळ 17 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 18 चेेंडूवर 59 धावा ठोकल्या. यात 4 चौकार व 6 षटकारांचा समावेश होता. कर्णधार फिंचने नाबाद 31 धावांचे योगदान दिले. स्टॉयनिस याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. ‌

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या यशाने शास्त्रींचा आनंद गगनात मावेना; म्हणाले, “त्याने आता सर्वांची…”
पाकिस्तानला धूळ चारून भारतीय संघ सिडनीत दाखल, नेदरलंडसोबत खेळायचा आहे पुढचा सामना 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---