जगभरात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातलेले असताना सर्वजण त्यापासून बचावासाठी प्रयत्न करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकी किंवा इतर गोष्टी टाळण्यास सांगितल्या जातायेत. लोक या आजारातून वाचण्यासाठी काळजी घेत असताना, जर्मनीतील फुटबॉल लीगमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली. फ्रान्सचा फुटबॉलपटू मार्कस थुरम विरोधी संघाच्या खेळाडूच्या तोंडावर थुंकला. कारवाई म्हणून फुटबॉल महासंघाने त्याला निलंबित केले आहे.
बुंदेसलीगा मध्ये घडली घटना
जर्मनीतील प्रमुख फुटबॉल लीग असलेल्या बुंदेसलीगा फुटबॉल लीगमध्ये बोरुसिया मोनशेनग्लाबाख संघाकडून खेळणारा फ्रान्सचा स्ट्रायकर मार्कस थुरम याने विरोधी होफेनहीम संघाचा बचावपटू स्टीफन पोशच्या तोंडावर थुंकण्याचा लाजिरवाणा प्रकार केला. टॅकल करताना झालेल्या वादानंतर थुरमने ही गोष्ट केली. या सामन्यात रेफ्री म्हणून काम पाहणाऱ्या फ्रॅन्क विलनबर्ग यांनी सदर घटनेचा व्हिडीओ पाहून थुरम याला मैदानाबाहेर काढले. तसेच, पोश यालादेखील यलो कार्ड दाखवण्यात आले.
https://youtu.be/MI3lfDDoaIU
थुरमवर झाली कारवाई
या घटनेनंतर थुरमवर कारवाई करण्यात आली. बोरुसिया मोनशेनग्लाबाख संघाने थुरमच्या एका महिन्याचा पगार कापला आहे. ती रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येईल. जर्मन फुटबॉल महासंघाने देखील त्याच्यावर ५ सामन्यांची बंदी घातली. डिसेंबर २०२१ पर्यंत त्याने आपल्या वर्तनात सुधारणा आणावी, अशी अट ठेवली आहे.
फ्रान्सचा प्रमुख खेळाडू आहे थुरम
फ्रान्सचे माजी विश्वविजेते खेळाडू लिलीयन थुरम यांचा तो मुलगा होत. मार्कसने प्रत्येक वयोगटात फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले आहे. याच वर्षी त्याने राष्ट्रीय संघासाठी आपला पहिला सामना खेळला होता. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात तो एकही गोल करू शकला नाही. २०१९ मध्ये बोरुसिया मोनशेनग्लाबाख संघात सामील झाल्यापासून त्याने ४२ सामन्यात १२ गोल झळकवले आहेत.
थुरम आला होता प्रसिद्धीझोतात
फ्रान्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा थुरम यावर्षी मे महिन्यात चर्चेत आला होता. अमेरिकेतील कृष्णवर्णीय कलाकाराची हत्या झाल्यानंतर, चालवलेल्या ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर’ या मोहिमेत त्याने सहभाग नोंदवलेला. फ्रान्समध्ये त्याने या मोहिमेचे नेतृत्व करत, चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती.
महत्वाच्या बातम्या:
– आयएसएल २०२०: चुरशीच्या लढतीत ओदिशा-नॉर्थईस्ट बरोबरी
– शुभमंगल सावधान! फिरकीपटू युझवेंद्र चहलची विकेट पडली, धनश्री वर्मासोबत बांधली लगीनगाठ
– वेध बाळाचे! विराट कोहली टीम इंडियाला प्रोत्साहन देऊन भारतासाठी रवाना