दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक आणि सध्या राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या मार्क बाऊचर याने आपल्या कारकिर्दीवेळी अपमानास्पद गाणी गात असलेल्या एका गटाचा भाग असल्याबद्दल आणि कृष्णवर्णीय सहकाऱ्यांना टोपणनावे दिल्याबद्दल माफी मागितली आहे. पॉल ऍडम्ससह काही सहकाऱ्यांनी वर्णद्वेषाचा आरोप केल्यानंतर बाऊचरने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या (सीएसए) सामाजिक न्याय आणि राष्ट्र निर्माण (एसजेएन) समितीला १४ पानांचा माफीनामा सादर केला.
ऍडम्सने एसजेएनसमोर सुनावणीदरम्यान दावा केला की, बाऊचर त्या सहकाऱ्यांपैकी एक आहे ज्यांनी गाण्यांमधून त्याच्याबद्दल वर्णद्वेषी टिप्पणी केली होती.
या शब्दात मागितली माफी
एका प्रसिद्ध क्रिकेट वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार आरोपांना उत्तर देताना बाऊचर म्हणाला,
“मी आणि माझे सहकारी अधिक संवेदनशील असायला हवे होतो. बाउचरने प्रतिज्ञापत्रात लिहिले, कोणत्याही आक्षेपार्ह वर्तनासाठी, प्रत्यक्ष किंवा कथित, ज्यासाठी मला जबाबदार धरले गेले आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्या काळात आम्ही, संघ, कोचिंग स्टाफ, निवडकर्ते आणि संघटना अधिक संवेदनशील असायला हवे होतो. संघात असे वातावरण निर्माण केले पाहिजे, जेथे संघाचे सर्व सदस्य या समस्यांबद्दल बोलू शकतील.”
बाऊचरने सहकाऱ्यांसह अपमानास्पद गाणी गाण्यात किंवा अपमानास्पद टोपणनाव ठेवल्याबद्दल माफी मागितली आहे.
दिग्गज यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो बाउचर
मार्क बाऊचर हा क्रिकेट विश्वातील सर्वात दिग्गज यष्टिरक्षक म्हणून ओळखला जातो. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी खेळताना यष्टीरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ९९९ बळी मिळवले आहेत. २०१२ इंग्लंड दौऱ्यावर यष्टीरक्षण करताना डोळ्यावर बेल्स लागल्याने त्याची कारकीर्द आकस्मिकपणे संपुष्टात आली. बाऊचर २०१९ पासून दक्षिण आफ्रिकेचा मुख्य प्रशिक्षक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या सलामीवीराला झालंय तरी काय? ‘या’ नको असलेल्या विक्रमात केली जसप्रीत बुमराहची बरोबरी
वयाच्या १९ व्या वर्षी सचिनने रचलेला लीड्सवर इतिहास, याच मैदानावर रंगणार तिसरी कसोटी
एकेकाळी ज्याच्याबरोबर झाला होता वाद, आज तोच खेळाडू उतरला जस्टीन लँगरच्या समर्थनार्थ