भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध सुरु ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याने चेंडूसह बॅटने ही अप्रतिम कामगिरी केली आहे. तर, दुसरीकडे इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज फलंदाजीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. दरम्यान रॉरी बर्न्सने जसप्रीत बुमराहच्या एका नको असलेल्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणे तसेच शून्यावर बाद होणे हे प्रकार सुरूच असतात. अकराव्या क्रमांकाचे फलंदाज अनेकदा शून्य धावांवर बाद होऊन माघारी परततात. त्यामुळे यात काही आश्चर्यकारक वाटत नाही. परंतु, संघातील सलामीवीर फलंदाज जर सतत शून्य धावांवर बाद होत असेल तर ही आश्चर्यकारक बाब आहे.
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्स हा यावर्षी ५ वेळेस शून्य धावांवर माघारी परतला आहे. असा कारनामा करत त्याने जसप्रीत बुमराहची बरोबरी केली आहे. बुमराह देखील यावर्षी ५ वेळेस शून्यावर बाद झाला आहे.
रॉरी बर्न्सची निराशाजनक कामगिरी हे इंग्लंड संघाच्या पराभवाचे कारण ठरत आहे. भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात २ वेळेस शून्य धावांवर बाद झाला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज लवकर माघारी परतले होते. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी मिळून नाबाद ८९ धावांची भागीदारी केली होती. बुमराहने या डावात २८ आणि ३४ धावांची खेळी केली आहे. तो एकदा ही शून्य धावांवर बाद होऊन माघारी परतला नाही. (Jasprit bumrah and Rory burns records most ducks in 2021)
तसेच २०२१ मध्ये सर्वाधिक वेळेस ० धावांवर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जसप्रीत बुमराह आणि रॉरी बर्न्स पहिल्या स्थानी आहे. तर इंग्लंड संघातील ३ आणि झिम्बाब्वे संघातील १ खेळाडू ४ वेळेस बाद झाला आहे. या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहलीचा देखील समावेश आहे. विराट कोहली यावर्षी ३ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. विराटसह जॉनी बेअरस्टो, सॅम करण आणि स्टुअर्ट ब्रॉडचे देखील नाव या यादीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तयारी हेडिंग्ले कसोटीची! मालिकेत २-० ने आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ गाळतोय घाम, पाहा फोटो
रवी शास्त्रींना तिसऱ्या कसोटीपूर्वी बाउन्सर, यॉर्कर आणि बीमरची झाली आठवण; वाचा नक्की काय आहे भानगड
वयाच्या १९ व्या वर्षी सचिनने रचलेला लीड्सवर इतिहास, याच मैदानावर रंगणार तिसरी कसोटी