इंडियन प्रीमियर लीग 2023च्या क्वॉलिफायर दोननंतर मुंबई इंडियन्सचा प्रवास संपला. क्वॉलिफायर एकमध्ये गुजरात टायटन्सल चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पारभूत जाली होती. अशात अंतिम सामन्यापूर्वी त्यांना क्वॉलिफायर दोन सामना जिंकावा लागणार होता. शुक्रवारी (26 मे) गुजरातने मुंबईला 62 धावांनी पारभूत केले आणि अंतिम सामन्यात धडक दिली. या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर या आपल्या वेगवान गोलंदाजांची कमी जाणवली.
आयपीएल 2023मध्ये मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी आक्रमण सर्वोत्तम असेल, असा बहुतांश जाणकारांचा अंदाज होता. मात्र, आयपीएल 2023 सुरू होण्याआधीच जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या लीगमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. दुसरीकडे जोफ्रा आर्चर () शस्त्रक्रियेनंतर मैदानात परतला होता. पण आयपीएल खेळणार की नाही, याविषयी संभ्रम कायम होता. असे असले तरी, आर्चर आपल्या दुखापतीतून सावरला आणि यावर्षी आयपीएलमध्ये खेलळा. आयपीएल सुरू असतानाही आर्चरच्या दुखापतीच्या बादम्या समोर आल्या आणि त्याने हंगाम अर्ध्यात असताना मायदेशात परतण्याचा विक्रम केला.
मार्क बाउचर यांच्या मते जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर खेळत नसल्यामुळे मुंबईच्या संघात मोठी पोकळी तयार झाली. या दोघांची झागा भरून काढणे इतर गोलंदाजांना जमले नाही, असेही आपण म्हणू शकतो. गुजरातविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर बाउचर माध्यमांशी चर्चा करत होते. यावेळी प्रशिक्षक बाउचर म्हणाले, “तुम्ही पाहू शकता की, जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर उलब्ध नव्हते. दोघेही संघाचे अप्रतिम गोलंदाज आहेत. जर तुम्ही अशा प्रकारचे खेळाडू गमावले, तर संघात एक मोठी पोकळी बनते. मी कोणावर आरोप करू इच्छित नाही, पण खेळताना दुखापत होत राहते. आपण अशा दुखापतींना तोंड दिले पाहिजे.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सने 20 षटकांमध्ये 3 बाद 233 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स 18.2 षटकांमध्ये 171 धावांवर सर्वबाद झाला. गुजरातसाठी शुबमन गिलने 60 चेंडूत 129 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तर मुंबईसाठी सूर्यकुमार यादव सर्वाधिक धावांचे योगदान देऊ शकला. सूर्यकुमारने 38 चेंडूत 61 धावांचे योगदान दिले. गुजरातच्या विजयात वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याचेही योगदान महत्वाचे ठरले. मोहितने अवघ्या 2.2 षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. (Mark Boucher recalls Jasprit Bumrah and Jofra Archer after Mumbai Indians’ exit for the season)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिल आणि साराचं बिनसलं? सलामीवीरने शतक ठोकताच समोर आली मोठी माहिती
‘सूर्याने सहा सिक्स मारले असते तरी फरक पडला नसता…’, जाणून घ्या मोहित शर्मा असं का म्हणाला