क्रिकेटच्या इतिहासात अनेक उत्कृष्ठ यष्टीरक्षक होऊन गेले. यातील एक महत्त्वाचा यष्टीरक्षक ज्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एक वेगळीच कलाटणी दिली तो म्हणजे मार्क बाउचर. तो आज त्याचा 42वा वाढदिवस साजरा करत आहे.
मार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक असे 998विकेट घेतले असून त्याने गोलंदाजी करताना एक विकटही घेतली आहेत. यात त्याने 147 कसोटीमध्ये यष्टीमागे घेतलेल्या 555 विकेटचाही समावेश आहे.
1000 विकेट पूर्ण करण्यास 2 विकेट बाकी असताना त्याला 2012च्या दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यात डोळ्याला दुखापत झाल्याने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली होती.
त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या या खास गोष्टी:
– 3 डिसेंबर, 1976मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व लंडन शहरात जन्म झाला. वेरडॉन आणि हेथर बाउचर मार्कचे पालक असून त्याला दोन बहीणी आहेत.
– पूर्व लंडनच्या बॉर्डर येथील शाळेकडून तो क्रिकेट, स्क्वॉश, स्विमींग, टेनिस आणि रग्बी या खेळांमध्ये सहभागी झाला आहे. 1995ला इंग्लंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षाखालील संघात पदार्पण केले.
– रिचर्ड पायबस हे मार्कचे प्रशिक्षक होते. त्यांनी पाकिस्तान, विंडीज आणि बांगलादेश संघासोबत काम केले आहे. त्यांनी एका विकेटकिपींगच्या कॅम्पवेळी मार्कमधील कौशल्य ओळखले.
– 19 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय संघात खेळताना मार्कने सलामीला फलंदाजी केली होती.
– दक्षिण आफ्रिकेकडून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यष्टीमागे सर्वाधिक असे 19 विकेट घेणारा मार्क पहिलाच खेळाडू ठरला
19 days until #CT17!
Mark Boucher took 19 dismissals at the ICC Champions Trophy, the most by a South Africa player! 🇿🇦 pic.twitter.com/4Eu0CnGMk7
— ICC (@ICC) May 13, 2017
– आतंरराष्ट्रीय क्रिकटमध्ये मार्कच्या नावावर एक विकेटही आहे. 2005मध्ये विंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने ड्वेन ब्रावोला बाद केले होते.
– दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना त्याने फक्त एकाच सामन्यात यष्टीरक्षण केले नाही. 2010मध्ये विंडीज विरुद्धच्या पाच वन-डे सामन्यपैकी चार सामने तो खेळला नाही. तर पाचव्या सामन्यात त्याने क्षेत्ररक्षण करताना एक झेलही घेतला होता.
– 1998पासून दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघात खेळताना मार्कने 13वर्षाच्या वन-डे कारकिर्दीत यष्टीमागे 425 विकेट घेतल्या. ही त्याची सर्वोच्च तिसऱ्या क्रमांकाची उत्तम कामगिरी ठरली.
#OnThisDay in 1998, Mark Boucher made his ODI debut for South Africa. In a 13 year ODI career, he made 425 dismissals, the 3rd most ever pic.twitter.com/4awuxR00cc
— ICC (@ICC) January 16, 2017
– 2011च्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) हंगामात मार्कला कोणत्याच संघाने विकत न घेतल्याने त्याने समालोचन केले होते. मात्र कोलकाता नाइट रायडर्सचा क्रिकेटपटू ब्रॅड हॅडिन दुखापतग्रस्त झाल्याने त्याने कोलकता संघाकडून मधल्या फळीत फलंदाजी केली होती.
– निवृत्तीनंतर तो दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या गेंड्याच्या तस्करी विरोधासाठी काम करत आहे. यासाठी त्याची बाऊचर लीगसी नावाची संस्थाही आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहली त्या कॅप्शनमुळे झाला सोशल मीडियावर ट्रोल
–भारतीय फलंदाजांसाठी आॅस्ट्रेलियाचा हा गोलंदाज ठरू शकतो मोठा धोका
–कसोटी मालिकेत आर अश्विन आहे टिम इंडियाचे महत्त्वाचे अस्त्र