---Advertisement---

नावडतीचे मीठ आळणी! विराटच्या शतकांनंतरही ऑस्ट्रेलियन दिग्गजाला दिसली कमजोरी, म्हणाला…

On: बुधवार, मार्च 15, 2023 5:20 PM
Virat-Kohli
---Advertisement---

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या चौथ्या कसोटीत चौथ्या दिवशी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने वादळी खेळी साकारली. त्याच्या खेळीमुळे भारताला मोठी आघाडी घेण्यात यश आले. या सामन्यात विराट कोहली याने तब्बल 1205 दिवसांनंतर शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला. हा चौथा सामना अनिर्णित राहिला, पण भारताने मालिका 2-1ने खिशात घातली. विराटच्या या शतकाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच ऑस्ट्रेलियाच्या एका माजी क्रिकेटपटूने वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.

जगातील अव्वल फलंदाज असला तरी या मालिकेपूर्वी विराट कोहली (Virat Kohli) याने खेळलेल्या 15 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते. त्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, चौथ्या कसोटीत त्याने 364 चेंडूत 186 धावा चोपल्या. यामध्ये 15 चौकारांचाही समावेश होता. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्या या शतकानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ म्हणाला,

“विराटच्या शतकांचा दुष्काळ संपला. कौतुकही झाले. मात्र, मला वाटते की ही विराटची सर्वश्रेष्ठ खेळी नव्हती. कारण, त्याने अत्यंत कमी जोखीम घेतली. तो केवळ खराब चेंडूवर आक्रमण करत होता. असे असले तरी त्याने त्याचा दर्जा नक्कीच दाखवून दिला.”

या मालिकेत यापूर्वी विराटच्या क्षेत्ररक्षणावरून देखील वॉ याने टीका केली होती.

अहमदाबाद कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या खेळात विराटने शानदार शतक ठोकले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 28वे शतक होते. विराटने 3 वर्षे, 3 महिने आणि 20 दिवसांनंतर कसोटी शतकांचा दुष्काळ संपवला. यापूर्वी विराटने शेवटचे शतक 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध ठोकले होते.

(Mark Waugh Said It’s Not Virat Kohli Best Inning In Ahmedabad Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! हरमनप्रीतने भिरकावला चेंडू, पण सीमारेषेवर ‘सुपरवुमन’ हरलीनने पकडला अफलातून कॅच, पाहा Video
वर्ल्डकपनंतर रोहितचा पत्ता कट करून हार्दिक बनू शकतो भारताचा पर्मनंट कॅप्टन, गावसकरांची मोठी भविष्यवाणी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---