ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात मंगळवारी (1 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENGvNZ) हा सामना खेळला गेला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, इंग्लंडने अखेरच्या पाच षटकात शानदार गोलंदाजी करत सामना 20 धावांनी खिशात घातला. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) याने स्पर्धेतील आत्तापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही केला.
सध्या जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांच्या यादीत समाविष्ट असलेल्या वूडने या विश्वचषकात अक्षरशः आपल्या गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना पेचात टाकले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही त्याचा हाच वेग पुन्हा एकदा पाहायला मिळाला. न्यूझीलंडच्या डावाच्या सहाव्या षटकातील अखेरचा चेंडू त्याने तब्बल 155.4 किमी प्रतितास इतक्या वेगाने टाकला. या चेंडूवर फलंदाजी करणारा न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स हा देखील चकित झाला. मात्र, या चेंडूवर चौकार त्याने वसूल केला. विशेष म्हणजे या षटकातील सर्वच चेंडू वूडने 150 किमी प्रतितास वेगाने टाकले होते.
Fastest balls of the T20 World Cup #T20WorldCup #ENGvNZ pic.twitter.com/TgCfWLxENc
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) November 1, 2022
वूडने यापूर्वी देखील या विश्वचषकात सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. इंग्लंडविरुद्ध आयर्लंड सामन्यात त्याने हा चेंडू टाकलेला. सध्या या विश्वचषकात सर्वाधिक वेगवान गोलंदाजी करणाऱ्या यादी त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या एन्रिक नॉर्किएचा क्रमांक लागतो. त्याने भारताविरुद्ध 153 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन व पाकिस्तानचा हारिस रौफ असून, त्यांनी प्रत्येकी 151 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकलेले. तर, पाकिस्तानच्या नसीम शहाने 148 किमी प्रतितास वेगाने भारताविरुद्ध चेंडू टाकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खास रे! भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी श्रीलंकेच्या सिंहांनी करून दाखवलीय
अरे काय हे, बांगलादेशविरुद्धही राहुलच करणार ओपनिंग! हेड कोच द्रविडने सांगितले त्यामागचे कारण